आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन ट्रीट:नाटकाच्या पडद्यामागील धमाल किस्से सांगताहेत स्वतः कलाकार,  ‘किस्से बहाद्दर’मधून जाणून घेता येतील खास गोष्टी 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा कार्यक्रम स्वरंग मराठीच्या युट्युब चॅनेल आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सध्या लॉकडाऊनच्या या काळातसुध्दा मनोरंजन क्षेत्रामधून प्रेक्षकांसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. असाच एक नवा उपक्रम "स्वरंग मराठी" या नव्या वाहिनीने हाती घेतला आहे. आता 'किस्से बहाद्दर' या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना नाटकाच्या पडद्यामागील कलाकारांचे भन्नाट किस्से ऐकता येणार आहेत.

विप्लवा एंटरटेनमेंटस् आणि पॅलेट मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या यांनी याची निर्मिती केली असून पहिल्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी धमाल किस्से सांगितले आहेत.

या कार्यक्रमात संजय मोने, शरद पोंक्षे, विजय कदम, मंगेश कदम, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, अविनाश नारकर, भार्गवी चिरमुले, श्रुजा प्रभुदेसाई, ऋतुजा बागवे, शशांक केतकर आदी मान्यवर कलाकार सहभागी झाले आहेत. तर सचिन सुरेशने सूत्रसंचालन केलं असून कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुश्रुत भागवतने केलं आहे. हा कार्यक्रम स्वरंग मराठीच्या युट्युब चॅनेल आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...