आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो स्टोरी:सत्यवानाची भूमिका वठवणारा अभिनेता आहे तरी कोण? जाणून घ्या त्याच्याविषयी A to Z

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्यने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.

'सत्यवान सावित्री' ही नवी मालिका लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संयमी, सौम्य आणि शूर जंगलपुत्र अशी 'सत्यवान' यांची भूमिका अभिनेता आदित्य दुर्वे साकारणार आहे. ही मालिका येत्या 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आदित्यची ही पहिलीच पौराणिक मालिका आहे. जाणून घेऊया आदित्यच्या खासगी आयुष्याविषयी -

आदित्य दुर्वेचा जन्म 30 मार्च 1996 मुंबईत झाला. त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले.

आदित्यने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंग करत असताना त्याने ओप्पो टाइम्स फ्रेश फेस या स्पर्धेत भाग घेतला आणि तो या स्पर्धेत दुस-या स्थानी राहिला.

मॉडेलिंग करत असताना आदित्यने हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

लाईफ ओकेवरील 'कॉमेडी क्लासेस' या कॉमेडी शोमध्ये आदित्यने एक छोटीशी भूमिका केली होती. यानंतर त्याला मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

'दिल दोस्ती दुनियादारी' ही त्याची पहिली मराठी मालिका होती आणि मालिकेनंतर त्याला 'मंडळ भारी आहे' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

कलर्स वाहिनीवरील 'सोनियाची पावलं' या मालिकेतून आदित्य घराघरांत पोहोचला. त्याने साकारलेली दुष्यांतराव इनामदार ही त्याची भूमिका बरीच गाजली होती. या मालिकेत त्याच्यासोबत ज्योती निमसे ही मुख्य भूमिकेत झळकली होती.

आता आदित्य सत्यवान सावित्री मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे.या मालिकेत त्याच्यासह वेदांगी कुलकर्णी ही अभिनेत्री मुख्य भूमिका वठवतेय.

बातम्या आणखी आहेत...