आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर आणि लता दीदी:'या' घरात 10 रुपये भाड्याने वास्तव्याला होते मंगेशकर कुटुंब, वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी कोल्हापुरात येत असे दीदी

कोल्हापूर | प्रिया सरिकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन खोल्या असलेल्या या घरात दहा रुपये भाड्याने मंगेशकर कुटुंब वास्तव्याला होते.

लतादीदींच्या जडणघडण कोल्हापुरात झाली. लता मंगेशकर यांना दीनानाथ यांनी आपल्या फिल्म कंपनीत संधी दिली, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरात झाली. दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. आई माई मंगेशकर आणि उषा, आशा, मीना व हृदयनाथ यांच्यासह लतादीदी कोल्हापुरात आल्या.

सुरुवातीच्या काळात मंगेशकर कुटुंब मंगळवार पेठ खरी कॉर्नर येथे बाबूराव पेंटर यांच्या घराजवळ राहायचे. तीन खोल्या असलेल्या या घरात दहा रुपये भाड्याने मंगेशकर कुटुंब वास्तव्याला होते.

कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील याच घरात दीदी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला होत्या.
कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील याच घरात दीदी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला होत्या.

कुटुंब चालवण्यासाठी त्या मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये काम करू लागल्या. त्यांची कारकीर्द खरंतर 1942 च्या दरम्यान बालअभिनेत्री म्हणून सुरू झाली.

पुढे मास्टर विनायक यांनी आपल्या फिल्म कंपनीचे मुंबईला स्थलांतर केल्यानंतर त्यांचे कर्मचारीही मुंबईला स्थायिक झाले. पुढे त्यांना भालजी पेंढारकर यांचा सहवास लाभला. भालजी कोल्हापुरात आल्यानंतरही त्यांचा लतादीदींशी स्नेह कायम होता. त्या वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी कोल्हापुरात यायच्या. कोल्हापुरात फिरण्यासाठी एक गाडी मात्र त्यांच्यासाठी ठेवलेली असायची. 2005 साली त्यांनी कोल्हापूरात येऊन अंबाबाई दर्शन घेतले होते. कोल्हापूरशी लतादीदीचे खास नातं होतं. पन्हाळ गडावर असलेल्या घरात राहण्यासाठी लतादीदी वर्षातून दोनदा कोल्हापूरला यायच्या.

जयप्रभा स्टुडिओवरुन झालेला वाद मात्र चांगलाच गाजला. स्टुडिओच्या जागेच्या विक्रीच्या हालचाली झाल्या तेव्हा कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध केला. लता मंगेशकर आणि भालजींसह त्यांच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध होते. त्या भालजींचा शब्द अखेरचा मानायच्या. मुंबईला गेलेल्या लतादीदी भालजींमुळे पुन्हा कोल्हापूरशी जोडल्या गेल्या. भालजींवर बँकेचे कर्ज असल्याने जयप्रभा स्टुडिओ लिलावात काढण्याची वेळ आली. लतादीदींनी हा स्टुडिओ विकत घेतला. स्टुडिओचा व्यवहार होताना मात्र भालजींनी लतादीदींना या परिसराचा वापर केवळ चित्रपट व्यवसायासाठीच केला जावा अशी अट घातली होती.

भालजी असेपर्यंत लतादीदींनी शब्द पाळला. पुढे काही वर्षांनी स्टुडिओ वगळता मोकळी जागा विकासकाला विकण्यात आली. पण लता मंगेशकर यांनी सुरुवातीच्या टप्प्यात स्टुडिओच्या विकासासाठी तयारी दर्शवली होती. अखेर 2012 साली स्टुडिओच्या जागेच्या विक्रीच्या हालचाली झाल्या तेव्हा कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध केला. या घटनेनंतर त्या कोल्हापूरपासून दुरावल्या.

सध्या जयप्रभा स्टुडिओ बंद आहे. पण स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरातील इथल्या चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या रंगकर्मींचे प्रयत्न सुरू आहेत. स्टुडिओची इमारत हेरिटेज वास्तुत मोडते. ती वास्तू वगळता बाहेरच्या बाजूला असलेली रिकामी जागा बिल्डरला देण्यास हरकत नसल्याचे रंगकर्मींचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...