आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लता दीदी यांचे लातूर जिल्ह्याशी घट्ट नाते आहे. त्याला कारणही तसेच आहे. लता दीदींचे वडील स्व. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या उदघाटनासाठी 4 डिसेंबर 1976 रोजी लता मंगेशकर या औराद शहाजनी येथे आल्या होत्या. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण आणि त्यांची बहीण उषा मंगेशकर यांची उपस्थिती होती.
1976 मध्ये औराद शहाजनी या गावात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयासाठी निधी उभारण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लता मंगेशकर स्वतः उपस्थित होत्या. मराठवाड्यातील ती त्यांची एकमेव भेट ठरली. यावेळी लांबच्या खेड्यापड्यातून लाखोंच्या संख्येने लोक त्यांना ऐकण्यासाठी तिथे आले होते. बैलगाड्यात बसूनही अनेकांनी हा कार्यक्रम ऐकला होता. शशांक लालचंद यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची प्रकाश योजना, ध्वनी यंत्रणा सगळे काही सांभाळले होते. या कार्यक्रमातून उभ्या राहिलेल्या निधीतून हे महाविद्यालय उभे राहिले आहे. मंगेशकर कुटुंबाचे हे स्मारक आहे, असे म्हणता येईल. अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार सुधीर सेवेकर यांनी सांगितले.
अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी लता दीदी कधीच मराठवाडा किंवा औरंगाबादला आलेल्या नाहीत. पण, औरंगाबादेतील कलावंत त्यांना मुंबईत भेटल्याचे देखील फारसे संदर्भ नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.