आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सूर हरपला:पद्मजा फेणाणी, साधना सरगम, उत्तरा केळकर यांच्यासह मराठी कलाकारांनी व्यक्त केला शोक, अशोक सराफ म्हणाले - आपल्या मराठी माणसातील एक हीरा हरवला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वरा कोकिला भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाली होती. 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 8.12 वाजता उपचारादरम्यान अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 'भारतरत्न' लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेते अशोक सराफ
'आज ही अत्यंत वाईट घटना घडली आहे. एक स्वर्गीय सूर हरपला, आपल्या मराठी माणसातील एक हीरा हरवला आहे. शब्द तोकडे पडत आहे, असा स्वर पुन्हा होणे नाही. त्यांची आठवण माझ्या मनात कायम राहील. कायम भेटल्यावर नमस्कार हो असे आवर्जुन त्या म्हणायच्या. माझ्या त्या फॅन होत्या. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.'

गायिका पद्मजा फेणाणी
'संगीताचा आमचा आधार गेला, संगीताचे आमचे दैवत नाहीसे झाले आहे. गाणं कसे असावे याचा वस्तूपाठ म्हणजे गाण्याचे सादरीकरण कसे असावं, उच्चार कसे असावे, चांगले काय वाईट काय हे आपल्याला दीदीमुळे समजले. लता दीदी शब्दांत सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

गायिका आरती अंकलीकर
'खूप अंतःकरण जड झालेले आहे, जीवनामध्ये लता दीदी नसत्या तर माझे जीवन वाळवंट झाले असते असा त्यांचा दैवी सूर इतका सात्विक आहे. किती समृद्ध केले त्यांनी जीवन आपले, प्रत्येक हिंदुस्तानी माणसाचे. आज त्यांच्या सगळ्या श्रोत्यांना त्यांनी पोरकं केले असे वाटते. आपल्या गाभा-यातील देव गेला असे वाटत आहे.'

गायक आनंद भाटे
'एक दैवी सूर आज हरपला आहे. लता दीदींचा सूर असा होता की जो प्रत्येकाच्या काळजाला जाऊन भिडायचा. मग तो कुठलाही मनुष्य असो, ज्याला सूर कळू दे अथवा नाही त्यांचा सूर काळजाचा भिडायचा. अगदी लहानपणापासून दीदींचा सूर कानी पडत होता. मी अगदी लहान असताना रसिक बालमा त्यांचे गाणे रेडिओवर ऐकलेले आठवते, ते गाणे आजही ऐकले की मला माझ्या बालपणीची आठवण होते. खरंच अशी बातमी येऊ नये असे सगळ्यांना वाटत होते, दुर्दैवाने आज हे बोलावे लागत आहे. त्यांना मनापासून खूप नमस्कार. हे मी भाग्य समजतो की, गेल्याच वर्षी आमच्या बालगंधर्व चित्रपटाविषयी त्यांनी ट्विट केले होते आणि सुबोध आणि माझे कौतुक केले होते, ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आज त्या शरीराने आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांचे सूर दशकानुदशके आपल्याला ऐकता येतील.'

गायिका सावनी रविंद्र

'मला असे वाटते जे दैवी व्यक्तिमत्त्व असतात ते शरीराने आपल्यातून निघून जातात, पण कतृत्वाने आपल्यातच असतात. आपल्यासाठी त्या सरस्वती आहेत. माझे खूप मोठे भाग्य आहे, की अनेकदा त्यांचे आशीर्वाद मला प्रत्यक्षात घेता आले. ज्या युगात त्यांचा जन्म झाला, त्या युगात माझा जन्म झाला, हे माझे भाग्य आहे.'

गायिका साधना सरगम

'बोलणं खूप अवघड आहे, कुठेतरी आशा होती की त्या ब-या होतील, पण तसे झाले नाही, संगीत जगताची मोठी हानी आहे. मंगेशकर कुटुंबीयांना एवढा मोठा आघात सहन करण्याची शक्ती देव त्यांना देवो. त्यांचा सूर, त्यांची गाणी अमर आहेत. त्यांना भेटल्यानंतर मी स्वतःला विसरुन जायचे. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिला आहे.'

गायिका उत्तरा केळकर
'त्या खूप आजारी होत्या ते माहित होतं. पण त्या गेल्यानंतर काळीज तुटलं. आयुष्यभर त्यांचे जाणे जाणवत राहिल. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.'

बातम्या आणखी आहेत...