आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलिवर्ल्ड अपडेट:देवाला परत आणण्यासाठी अक्का आणि गॅंगकडे आहेत फक्त 7 दिवस, 'डॉक्टर डॉन' मालिकेला रंजक वळण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोनिका देवाचं प्रेम विसरून विक्रांतचं प्रेम स्वीकारण्यासाठी तयार नाही आहे.

'डॉक्टर डॉन' या मालिकेत कॉलेजचा नवीन डीन डॉक्टर विक्रांत म्हणजेच अभिनेता सागर कारंडेची एंट्री झाल्यापासून मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे.

विक्रांतने मोनिकाला आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. देवा मोनिकापासून दूर असला तरी पण मोनिका देवाचं प्रेम विसरून विक्रांतचं प्रेम स्वीकारण्यासाठी तयार नाही आहे. तिची द्विधा मनस्थिती बघून मोनिकाच्या आईने मोनिकाला 7 दिवसांची मुदत दिली आहे. या 7 दिवसात जर मोनिका देवाला परत मिळवू शकली नाही तर मोनिकाची आई स्वतः तिचा हात विक्रांतच्या हातात देईल.

हे ऐकून कबीर देखील अस्वस्थ आहे. कबीर देवाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. अक्का आणि सत्या या दोघांकडे तो मदत मागतो. आता अक्का आणि संपूर्ण गॅंग कबीर सोबत देवाला शोधून काढून परत आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.

त्यांना देवाला परत आणण्यात यश मिळेल का? देवा परत आल्यावर मोनिकावरील त्याचं प्रेम पुन्हा व्यक्त करेल का? जर देवा परत नाही आला तर मोनिका विक्रांतच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...