आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवाकोरा कार्यक्रम:'चला हवा येऊ द्या'नंतर आता डॉ. निलेश साबळे म्हणणार 'लाव रे तो व्हिडीओ' 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. निलेश साबळे हास्याचा महापूर आणण्यासाठी सज्ज आहेत.
Advertisement
Advertisement

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे सूत्रधार डॉ. निलेश साबळे आता 'झी युवा' वाहिनीवरसुद्धा कल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. झी युवा वाहिनीवर लवकरच एक नवाकोरा आणि जबरदस्त टॅलेंटने भरलेला कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचे नाव आहे 'लाव रे तो व्हिडीओ'.  महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. घरबसल्या, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी, 'झी युवा'मुळे महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना मिळणार आहे. 

अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल अशा टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे.  या कार्यक्रमाच आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे. नीलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहेआणि तुमचे टॅलेंट वर त्यांची आवड निवड सांगणार आहेत. 

थोडक्यात सांगायचं झालं, तर झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी एक झकास एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन येत आहे. लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ, कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी, आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. 'लाव रे तो व्हिडीओ' या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाइल किंवा इंटरनेटवर अड्कले होते आता लाखो करोडो लोकानां टीव्हीवर पहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे हमखास मनोरंजन होईल.

एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.  

Advertisement
0