आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत रंजक वळण:आदिती आणि सिद्धार्थ सापडणार संकटात, बिबट्यापासून आदितीला वाचवू शकले का सिद्धार्थ!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिकमध्ये सुरु आहे.

झी मराठीवर 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे, त्यामुळे त्यातील सगळीच पात्र प्रेक्षकांना भावत आहेत,

या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. मालिकेतील लेटेस्ट ट्रॅकनुसार दस-यानंतर आदिती आणि सिद्धार्थ फोटोशूटसाठी माळ्यावर जातात. पण गावात बिबट्या शिरल्याचे त्यांना ठाऊक नसते. बिबट्या आदितीवर हल्ला करतो. सिद्धार्थ अदितीचं बिबट्यापासून रक्षण करतो.

हा भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...