आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एंटरटेन्मेंटला लागणार नाही ब्रेक:महाराष्ट्रात शूटिंगला बंदी, आता गोवा, सिल्वासा, जयपूर, दमणसह या ठिकाणी होणार मराठी मालिकांचे शूटिंग

25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मराठी मालिकांचेही चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ठाकरे सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याअंतर्गत आता 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक हिंदी मालिकांच्या निर्मात्यांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. तर मराठी मालिकांचेही चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. त्यामुळे मराठी मालिकांमध्ये आता नवीन सेट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह आणि झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या मालिकांमध्ये नवीन ट्विस्ट आणि टर्न्स आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये, यासाठी निर्मात्यांनी मालिकांचे चित्रीकरण गोवा, सिल्वासासह विविध ठिकाणी हलवले आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'पाहिले ना मी तुला', 'अग्गबाई सासूबाई' या मालिकांचे चित्रीकरण आता गोव्यात होणार आहे. तर 'माझा होशील ना' या मालिकेचे चित्रीकरण सिल्वासाला आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचे चित्रीकरण दमणला हलवण्यात आले आहे. तर 'होममिनिस्टर' या कार्यक्रमाचे चित्रीकरण आदेश बांदेकर घरुनच करणार आहेत. 'रात्रीस खेळ चाले 3' या मालिकेचे पुढील काही भाग बँक करुन ठेवण्यात आले आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते', 'सहकुटुंब सहपरिवार', 'मुलगी झाली हो' या मालिकांचे चित्रीकरण आता सिल्वासा येथे होणार आहे.

स्टार प्रवाहच्या मालिकांचे चित्रीकरण कुठे होणार आहे?

 • सांग तू आहेस का – सिल्वासा
 • फुलाला सुगंध मातीचा- अहमदाबाद
 • स्वाभिमान – सिल्वासा
 • सहकुटुंब सहपरिवार – सिल्वासा
 • सुख म्हणजे नक्की काय असतं – गोवा
 • रंग माझा वेगळा – गोवा
 • आई कुठे काय करते – सिल्वासा
 • मुलगी झाली हो – सिल्वासा

झी मराठी वाहिनीवरील मालिकांचे चित्रीकरण कुठे होणार आहे?

 • देवमाणूस – बेळगाव
 • माझा होशील ना – सिल्व्हासा
 • चला हवा येऊ द्या – जयपूर
 • पाहिले ना मी तुला – गोवा
 • अग्गंबाई सूनबाई – गोवा
 • येऊ कशी तशी मी नांदायला – दमण

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुख्यमंत्र्यांकडे चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती

दुसरीकडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज शहाजीराव राजेभोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अधिकाधिक नियम लावून का होईना परंतु शूटिंगला परवानगी द्या अशी विनंती केली आहे. यामध्ये काही खास खबरदारी घेऊन शूटिंग पार पाडू, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

 • अतिशय कमी युनिट मध्ये शूटिंग करणे.
 • बांधकाम क्षेत्राच्या धरतीवर ज्या ठिकाणी शूटिंग आहे त्याच ठिकाणी जास्तीत जास्त लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करु.
 • सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करून काटेकोर अंमलबजावणी करु.
 • कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांना कोविड टेस्ट कम्पलसरी करु.
 • सेटवर डॉक्टरांची उपलब्धता करून देवू.
 • खाण्यापिण्यासाठी पर्यावरण पूरक अशा वस्तूंचा वापर करू.
 • काळजी घेऊनही कोणी पॉझिटिव्ह आले तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवू किंवा होम क्वारंटाइन करु.
 • खाण्यापिण्याचे साहित्य बाहेरुन आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करु. त्यामुळे एकमेकांशी कमीत कमी संपर्क होईल.
 • सर्व टीमची ऑक्सिजन पातळी व टेंम्परेचर याची रोजचे रोज रोज नोंद घेवून रजिस्टर मेंटेन करु.
 • सार्वजनिक ठिकाणी शूटिंग टाळण्यात येईल.

आपण आमच्या मागणीचा गांभीर्याने व सकारात्मक विचार करुन चित्रीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...