आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्ट मॅरीड:'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नाच्या बेडीत, जाणून घ्या कोण आहे तिचा जोडीदार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुचिता आणि आनंद यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

'लव लग्न लोचा' आणि 'चिंतामणी' या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री रुचिता जाधव ही उद्योगपती आनंद माने यांच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे. 3 मे रोजी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पाचगणी येथील पाचगणी येथील निर्वाणा अॅग्रो रिसॉर्ट येथे दोघांचा विवाह सोहळा पार पडला. रुचिता आणि आनंद यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

एका मुलाखतीत रुचिताने सांगितले की, 'बंगल्यामध्ये तीन दिवस विवाह सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. या बंगल्याच्या बाहेरच्या आवारात लग्नसोहळा होणार होता. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आतमध्ये करावा लागला.'

रुचिता आणि आनंदच्या लग्नसोहळ्यामध्ये संगीत कार्यक्रम देखील होणार होता. परंतु त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. त्याऐवजी त्यांनी डाळ आणि तांदुळाची 1500 पाकीटे पाचगणीच्या परिसरात असलेल्या खेड्यांमध्ये वाटली.

रुचिता आणि आनंदचे अरेंज मॅरेज आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन होण्याआधी ते भेटले होते. डिसेंबर 2020 मध्ये रुचिता आणि आनंदने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...