आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'चांदनी बार', 'ट्रॅफिक सिग्नल', 'फॅशन', 'पेज 3', 'बबली बाउन्सर', 'इंडिया लॉकडाऊन' अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीमध्ये पदार्पण करत आहेत. आगामी 'सर्किट' या चित्रपटाची प्रस्तुती मधुर भांडारकर करत असून, अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
चित्रपटासाठी वैभवचे बॉडीबिल्डिंग
या चित्रपटातील भूमिकेसाठी वैभव तत्त्ववादीने आपल्या शरीरयष्टीवर भरपूर मेहनत घेतली आहे.चित्रपटात वैभव सिद्धार्थ मोहिते ही भूमिका साकारतोय. त्याने या भूमिकेसाठी बॉडीबिल्डिंग केले आहे. त्यासाठी त्याला प्रसाद शिर्के यांचे मार्गदर्शन मिळालं आहे. प्रसाद यांनी आजवर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, उर्वशी रौतेला यांना बॉडीबिल्डिंग ट्रेनर म्हणून फिटनेसचे धडे दिले आहेत.
वैभवने त्याचा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वैभवच्या बॉडीबिल्डिंगचे आणि लूकचे कौतुक सर्वत्र होत आहे. वैभवचा हा लूक पाहून चाहते इम्प्रेस झाले आहेत. अशी बॉडी हवी, असे काही चाहत्यांनी म्हटले आहे.
भालजी पेंढारकरांच्या नातूचे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल
विशेष म्हणजे भालजी पेंढारकर यांचा नातू आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आकाश गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक निर्मिती संस्था आणि चॅनल्समध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. "कच्चा लिंबू", "होम स्वीट होम", "मस्का", "भेटली तू पुन्हा", "पावनखिंड" अशा अनेक चित्रपटांची प्रस्तुती तर "चोरीचा मामला" या चित्रपटाची निर्मिती आकाश पेंढारकर यांनी केली आहे. त्यापुढे जात आता "सर्किट" या चित्रपटाद्वारे तो आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक
रोमान्स, अॅक्शन आणि थ्रिलरचा हा मसाला असणारा हा चित्रपट दुलकर सलमान (सिद्धार्थ) आणि साई पल्लवी (अंजली) स्टारर दाक्षिणात्य 'काली' या चित्रपटाचा रिमेक आहे. 2016 मध्ये आलेल्या कालीने विशेष लोकप्रियता मि्ळवली होती. रागाच्या भरात माणूस जीवघेण्या संकटात सापडू शकतो, असे कथानक या चित्रपटात दाखवण्यात आले होते. असेच कथानक 'सर्किट'मध्येही आहे. येत्या 7 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.