आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक हात मदतीचा:रितेश देशमुखनंतर मराठी सिनेसृष्टीतल्या कामगारांच्या मदतीसाठी पुढे आली माधुरी दीक्षित, कलाकारांना केले मदत करण्याचे आवाहन  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधुरी दीक्षितने इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.

जागतिक करोना महामारीमुळे बंधनकारक असलेला लाँकडाऊन, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. हातावर पोट असलेल्या अनेक मजुरांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना आता दोनवेळ काय खायचं हा प्रश्न सतावतोय, कारण हाताला काम नाही तर पोटाला अन्न नाही अशी त्यांची गत झाली आहे.

याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य  किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केली. आतापर्यंच 2500 सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोचवली गेली आहे. 

महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत 6000 पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी व संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती व बॉलिवूड कलाकारांना मदतीचे आवाहन केले होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित धावून आली आणि तिने अ .भा.म.चि. महामंडळाला भरघोस मदत केली आहे व त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ व कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच तिने इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.

यापूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दहा लाखांची मदत केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...