आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासगळ्यांची लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची 'महाराष्ट्राची ह स्यजत्रा' ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटीयेथे जाऊन अलीकडेच अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभ यांनी नी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं.
'तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करत आहात. ते सतत असंच करत राहा', असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.
सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' 20 सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.