आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राउड मोमेंट:महेश कोठारे म्हणाले - 'फिल्मफेअरची ही ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात धरण्याचा खूप खूप आनंद होतोय'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेश कोठारे यांनी या पुरस्कारासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

रविवारी मुंबईत मराठी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपट आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महेश कोठारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिल्मेफेअरची ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात धरण्याचा खूप आनंद होतोय, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पुरस्कारासोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

महेश कोठारे म्हणतात, "फिल्मफेअरची ही ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात धरण्याचा खूप खूप आनंद होतोय. 1987 साली 'धूमधडाका' या चित्रपटासाठी उत्कृष्ट चित्रपट तसेच उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मला अशाच दोन ब्लॅक लेडी मिळाल्या होत्या. फिल्मफेअरने पुन्हा एकदा मला 'Excellence in Marathi Cinema' साठी ही ब्लॅक लेडी प्रदान केल्याबद्दल मी त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे,' असे कोठारे म्हणाले.

त्यांनी या पुरस्कारासाठी चाहत्यांचेही आभार मानले आहेत. ते म्हणतात, 'हा पुरस्कार माझ्या या प्रदीर्घ वाटचालीत ज्या सर्वांनी मला मोलाची साथ दिली त्या सर्व उत्तम कलाकारांना, उत्कृष्ट टेक्निशियन्सना आणि सदैव माझ्यावर प्रेम करत मला सदैव प्रोत्साहित करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना अर्पण करतो. कारण आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच आहे. तुम्हा सर्वांना माझ्या अंतःकरणापासून माझे धन्यवाद," अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी महेश कोठारे यांना हा पुरस्कार प्रदान केला. 🏻

बातम्या आणखी आहेत...