आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटाचा वाद:आता 'ती' दृश्येही चित्रपटातून वगळण्यात आली, महेश मांजरेकरांची माहिती

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 जानेवारीला 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा आगामी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. परंतू या ट्रेलरमध्ये दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला. आता या सर्व वादावर महेश मांजरेकांनी प्रतिक्रिया देत सर्व आक्षेपार्ह दृष्ये ट्रेलर आणि चित्रपटातून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन जाहिर केले आहे.

महेश मांजरेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले, 'या चित्रपटाच्या प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणाऱ्या भावनांचा मान राखत आम्ही या चित्रपटाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी सर्व दृष्ये काढून टाकली आहे. तसेच हा प्रोमो सर्व ठिकाणांवरून काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात आला आहे. '

14 जानेवारीला 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...