आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना पितृशोक, वडील होते गणिततज्ञ  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेधा यांनी शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करुन भाविनक मेसेज लिहिला.

अभिनेत्री आणि दिग्दर्शक अभिनेता मंहेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजेरकर यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे वडिल हे एक गणिततज्ञ होते.

मेधा यांनी शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करुन भाविनक मेसेज लिहिला. त्यांनी आपले दुःख व्यक्त करताना लिहिले, “तुम्ही आम्हाला सोडून गेला असला तरी आमच्या अंत:करणात तुम्ही कायम जिवंत आहात. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि नातेवाईकांचे शेकडो संदेश येत आहेत. आपण ख-या अर्थाने सेलिब्रिटी होता. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि शिकवणुकीसाठी आणि दयाळूपणाबद्दल परिचित आहात. तुमच्या कर्मांनी तुम्हाला आमच्या दृष्टीने सेलिब्रिटी बनवले आहे. मी आज जे काही आहे, ते फक्त तुमच्यामुळे आहे बाबा. तुमची उणीव कायम भासेल.. 

महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या आणि मानलेली मुलगी गौरी यांनी इंस्टाग्रामवर आपल्या आजोबांचा फोटो शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...