आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आदित्य'ची कोरोनावर मात:‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णी कोरोनामुक्त, सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितले...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’मध्ये आदित्यची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विराजस कुलकर्णी कोरोनामुक्त झाला आहे. विराजसने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

विराजसने पोस्टमध्ये काय लिहिले...
विराजस कुलकर्णीने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘Hey guys… मागचे 10 दिवस 2 गोष्टी झाल्या-एक म्हणजे मी सोशल मीडियावरून गायब झालो होतो, आणि दुसरे-तुमच्या सगळ्यांचे मेसेज आणि कमेंट्सचा भडिमार होत होता… सगळ्यांना उत्तर देणे शक्य नव्हते. जसे तुम्हाला वाटतंय, तसेच झाले. गेल्या आठवड्यात मला कोरोनाची लागण झाली होती. पण टेन्शन घ्यायचे काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय आणि नशिबाने सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. दिवाळी मात्र या आजाराने खाल्ली, पण आता पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज झालो आहे आणि आपण टीव्हीवर आणि इथे भेटत राहूच. तुम्हा सगळ्यांचे, डॉक्टरांचे आणि या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या ‘माझा होशील ना’च्या संपूर्ण टीमचे खूप आभार. तुम्ही असाच सपोर्ट करत रहा, आणि माझा होशील ना एन्जॉय करत रहा!’

पुण्यातील घरी होता क्वारंटाइन
‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईत असलेल्या विराजसला काही कामानिमित्त पुण्याला जावे लागले होते. त्याच दरम्यान सेटवरदेखील सुट्टी असल्याने तो पुण्यातील त्याच्या घरी थांबला होता. या दरम्यान त्याला त्रास जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दुर्दैवाने ही चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र, कोणतीही लक्षणे नसल्याने विराजसला घरीच क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. आता कोरोना मुक्त झाल्यावर विराजस पुन्हा एकदा मालिकेचे चित्रीकरण सुरु करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...