आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मात्याने कलाकारांचे पैसे थकवले:प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळींनी थकवले कलाकारांचे पैसे, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पोस्ट शेअर करत केला गंभीर आरोप

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने 'मन हे बावरे' या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. चॅनेलचा उत्तम सपोर्ट असूनही कलाकार आणि तंत्रज्ञांना योग्य मोबदला मिळत नसल्याचे शर्मिष्ठा राऊतने म्हटले आहे. आपलेच पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागत असल्याचे शर्मिष्ठा म्हणाली आहे.

शर्मिष्ठाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन हे प्रकरण सर्वांसमोर आणले आहे. शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत असून या मालिकेत तिच्यासह मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर हे कलाकारही काम करत आहेत. या कलाकारांनीही शर्मिष्ठाची पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाली शर्मिष्ठा राऊत?
शर्मिलाने लिहिले, 'नमस्कार, आम्ही कलाकार चॅनल कोणतही असो निर्माता कोणीही असो, आम्ही कलाकार नेहमीच आपल्याकडून चांगले काम व्हावे या हेतून मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हात हेतू असतो आणि तो असावा. पण काम करुनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे योग्य आहे? अनेक वेळा असं होतं की, आपण खूप प्रामाणिकपणे आपले काम (शूटिंग) करतो... आपलं प्रोजेक्ट हे आपलं बाळ आहे आणि प्रॉडक्शन हाऊस हे आपलं घर असं समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रॉडक्शन हाऊस कडून मिळणा-या गोष्टींशी, प्रॉडक्शनच्या मिसमॅनेजमेंचशी अॅडजेस्टमेंट करुन सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरतकाम करत असतात. चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य मोबदला देत नाहीत... अनेक कारणं वारंवार मिळत असतात,' असे शर्मिष्ठाने सांगितले.

‘आपलेच पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागत आहेत’
शर्मिष्ठा पुढे लिहिते, 'आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला ह्या तत्वांतर्गत काम करत असतो. मात्र वेळेच्या वेळी चॅनलकडून पैसे येवून पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळणं हे योग्य आहे का? कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना, तंत्रज्ञांनाना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली, परंतु निर्मात्याने कोणालाही पैसे दिले नाही. निर्मात्याच्या अडीचअडचणींच्या वेळएस, एपिसोड्सची बँक नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे कॉश्च्युम नाही म्हणून घरुन आपले कॉश्च्युम आणून शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये, म्हणून मदत करणे आता चुक आहे का? आपल्या मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भीक मागितल्यासारखा सतत मागत राहणे हे योग्य आहे का?,' असा प्रश्नही शर्मिष्ठाने उपस्थित केला आहे.

या पोस्टसह तिने पुढे लिहिले, गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”, असे आवाहन शर्मिष्ठाने पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

शर्मिष्ठाची ही पोस्ट शेअर करत मन हे बावरे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल दुसानीसने लिहिले, 'गेली काही वर्षे मी टेलिव्हिजनमध्ये काम करतेय. कायम सहकार्य करणारेच निर्माते मिळाले. मात्र असा अनुभव पहिल्यांदा आला.. @mandarr_devsthali .....कोणाही कलाकाराच्या वाटेला असा अनुभव येऊ नये यासाठी मी ही पोस्ट टाकायचा प्रयत्न केलाय,' असे मृणाल म्हणाली.

अभिनेत्री विदिशा म्हसकर लिहिले, 'मी खुप लहान आहे . आणि तरी हे लिहावं लागतंय हे माझं दुर्दैव. मी मुंबई मध्ये एकटी राहते . घराच्या भाड्यापासून ते travelling पासून, 2 वेळच्या जेवणाचा आणि छोट्यातला छोटा खर्च मला माझाच करावा लागतो.. सगळी सोंग आणता येतात पैशाच सोंग नाही आणता येत..'

कोण आहेत मंदार देवस्थळी?
मंदार देवस्थळी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. यापैकी अनेक मालिका लोकप्रियही ठरल्या होत्या. यामध्ये ‘बोक्या सातबंडे’, ‘आपली माणसं’, ’झुंज’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘वसुधा’, ’खरंच माझं चुकलं का???’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’जिवलगा’, ‘मायलेक’, ‘कालाय तस्मैनम:’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा मालिकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...