आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मानसी नाईक हिच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. स्वतः मानसीने तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. नवीन वर्षात 19 जानेवारी 2021 रोजी प्रदीप खरेरासोबत मानसी लग्नगाठ बांधणार आहे. मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा हा व्यावसायिक बॉक्स आहे.
मानसीने आपल्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, पुण्यात 19 जानेवारी रोजी ती प्रदीपसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जानेवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा होईल. लग्नाच्या दिवशीच म्हणजे 19 जानेवारीला हळदीचा कार्यक्रम होईल.
मानसीने पुढे सांगितले की, दोन्ही कुटुंबीयांच्या परस्पर सहमतीने छोटा विवाहसोहळा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे खूप जवळचे नातेवाई आणि मित्रपरिवाला लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात केली होती साखरपुड्याची घोषणा
मानसीने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करुन प्रदीपसोबत एंगेज्ड झाल्याची घोषणा केली होती. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिले होते.
कोण आहे प्रदीप खरेरा?
मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. याशिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रदीप खरेराचे सोशल मीडिया अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.