आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसी नाईक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर:प्रदीप खरेरापासून होणार विभक्त, नवरा म्हणाला - मौत अच्छी है इस मोहोब्बत से!

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मानसीने एका मुलाखतीत घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे कबुल केले आहे. मानसी आणि प्रदीपयांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. इतकेच नाही तर त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटोदेखील डिलिट केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर आता मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळे झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिले आहे.

मी या क्षणाला खूपच दुःखी आहे
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदाच घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडले आहे. "घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटे बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे," असे मानसी म्हणाली आहे.

इतकेच नाही तर आता या लग्नाच्या नात्यातून वेगळे होण्याची वेळ आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे, असेही ती म्हणाली आहे.

प्रदीप खरेराने शेअर केली शायरी

घटस्फोटाचे वृत्त समोर आल्यानंतर प्रदीपने त्याच्या सोशल मीडियावर एक शायरी शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टचा संदर्भ त्याच्या खासगी आयुष्याशी जोडला जात आहे. दरम्यान त्याची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र अद्याप त्याने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. प्रदीप खरेराने शेअर केलेली शायरी “रो रहाँ हू एक मुद्दत से, इश्क जो हो गया था शिद्दत से, तजुर्बा है तभी तो कहं रहा हूँ, मौत अच्छी है इस मोहोब्बत से!!”

गेल्या वर्षी झाले होते लग्न
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचे लग्न 19 जानेवारी 2021 रोजी झाले होते. लग्नाआधी दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.

बातम्या आणखी आहेत...