आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासागरिका म्युझिक लवकरच नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओ घेऊन येत आहे. वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये मानसी नाईक झळकणार आहे. विशेष म्हणजे यात तिला साथ मिळणार आहे ती तिचा पती प्रदीप खरेराची. लग्नानंतरचा दोघांचा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. निलेश मोहरीरने "वाटेवरी मोगरा" या गाण्याची सुंदर रचना केली आहे. सागरिका म्युझिक सोबतच निलेशने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकाराने या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.
या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये सागरिकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात "वाटेवरी मोगरा"मध्ये दिसणार आहे. मानसी नाईकचा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे.
नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी 19 जानेवारीला मानसीने आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता प्रदीप खरेराशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत.
12 मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर हे गाणे रिलीज होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.