आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षया-हार्दिकचा बँड, बाजा, बारात:एकाच मांडवात वर-वधूला लागली हळद, जंगी झाला हळदीचा सोहळा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी आज साताजन्माच्या गाठीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सर्वच विधी मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. मेंदीसोहळ्यानंतर अक्षया आणि हार्दिकला एकाच मांडवात हळद लागली. या सोहळ्यासाठी सुंदर सजावट अशी सजावट करण्यात आली. या सोहळ्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत.

हळदी समारंभासाठी अक्षयाने व्हाइट कलरची सलवार-कुर्ती परिधान केली होती. तर हार्दिकनेही व्हाइट कलरचा कुर्ता घातला होता. इतर मंडळींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

यावेळी अक्षया आणि हार्दिकचे इंडस्ट्रीतील कलाकार मंडळीही उपस्थित होती.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत बरकत ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता अमोल नाईक हार्दिकचा जवळचा मित्र आहे. त्याच्या लग्नाच्या प्रत्येक विधीला त्याने हजेरी लावली आहे. अमोलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदी समारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

अक्षया आणि हार्दिकचा आज पुण्यात लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आता चाहते या दोघांना वर-वधूच्या रुपात बघण्यास उत्सुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...