आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जस्ट मॅरीड:मराठी कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, बघा लग्नसोहळ्याचे खास क्षण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशुतोषचे हे दुसरे लग्न आहे.

मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी 8 जानेवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकला. रुचिका पाटील हे आशुतोषच्या पत्नीचे नाव आहे. मोजके पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे आशुतोषचे हे दुसरे लग्न आहे.

आशुतोष आणि रुचिका यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आशुतोषने छोट्या पडद्यावरील ‘असंभव’, ‘साथ दे तू मला’, 'लेक माझी लाडकी', 'गंध फुलाचा गेला सांगून', 'भूरे भी हम भले भी हम' या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तो 'कुणी मुलगी देता का मुलगी', 'मिस मॅच' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आशुतोषची पत्नी रुचिका पाटील ही देखील मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. 'गणपती बाप्पा मोरया', 'असे हे कन्यादान' या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

रुचिका पाटीलने इंजिनिअरिंगची शिक्षण पूर्ण केले असून, 2014मध्ये ती ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेमध्ये ती सेकेंड रनरप ठरली होती.

आशुतोषच्या लग्नाला काही मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि तिचा पती दुर्वेश देशमुख तसेच अभिनेत्री सायली देवधर यांनी लग्नाला उपस्थिती लावून आशुतोष आणि रुचिका यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...