आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न ऐकलेल्या कथाचित्रपटांमध्ये द्विअर्थी संवाद आणणारे दादा कोंडके:चित्रपट बी ग्रेड पण सिल्व्हर ज्युबिलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्योतिषाने अपयशाचे केले होते भाकीत

आजच्या न ऐकलेल्या किश्श्यांमध्ये आपण जाणून घेणार आहोत बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या दादा कोंडके यांच्याविषयी. दादांना एकेकाळी उभ्‍या महाराष्‍ट्राने डोक्‍यावर घेतले होते. आजही दादांचे चित्रपट, गाणी आणि व्‍दिअर्थी विनोदाचे हजारो रसिक दिवाने आहेत. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची जाण दादांना होती ती त्‍यांनी अभिनयातून प्रभाविपणे जोपासलीही.

दादा यांचे चित्रपट दुहेरी अर्थाचे असायचे. दादा कोंडके यांनी सर्वाधिक सलग रौप्य महोत्सवी चित्रपटांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. त्यांचे 9 चित्रपट 25 आठवडे थिएटरमध्ये चालले. यापैकी काही 50 आठवड्यांपर्यंतही चालले होते. त्यांचा चित्रपट प्रवास जितका रंजक होता तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य वेदनादायी होते. 8 ऑगस्ट रोजी दादा कोंडके यांची 90 वी जयंती आहे.

वाचा, मराठीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते दादा कोंडके यांचे न ऐकलेले किस्से...

लालबागच्या चाळीत होती दादांची दहशत
तो काळ स्वातंत्र्यापूर्वीचा होता. 1932 ची ही गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याजवळील इंगवली या छोट्याशा गावातील एक कुटुंब कामाच्या शोधात मुंबईत आले होते. हे कुटुंब लालबागमधील एका चाळीत स्थायिक झाले, त्यातील बहुतेक सदस्य बॉम्बे डाईंगच्या सूतगिरणीत काम करुन उदरनिर्वाह करत असायचे.

या कुटुंबात 8 ऑगस्ट 1932 रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी एका मुलाचा जन्म झाला. भगवान कृष्णाच्या नावावरून मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले, तोच कृष्ण ज्याला लोक दादा कोंडके या नावाने ओळखतात. चाळीत दादागिरी करण्यासाठी कृष्णा बालपणी प्रसिद्ध होता. रेडिफला दिलेल्या मुलाखतीत खुद्द दादा कोंडके म्हणाले होते की, लालबाग परिसरात माझी दहशत होती. आमच्या वस्तीतल्या मुलींची कोणी छेडू काढू शकत नसायचे. मी विटा, दगड, सोड्याच्या बाटल्यांनी खूप मारामारी करायचो.

एका घटनेत घरातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला, फक्त एकच भाऊ बचावला

वास्तविक वर्षाचा कुठेही उल्लेख नाही, पण तरुण असतानाच दादा कोंडके यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांचा अपघाती मृत्यू झाला. कुटुंबात फक्त दादा कोंडके आणि त्यांचा एक मोठा बचावले होते. या अपघातामुळे दादा खूप कोलमडले होते. वर्षभर ते कुणाशीही बोलले नाहीत, त्यांनी खाणेपिणेही जवळजवळ बंद केले होते. दादा कोंडके एका मुलाखतीत म्हणाले होते, 'मला वाटले की मला वेड लागले. देवाने माझ्याशी असे का केले? वाटले की दु:ख विसरुन लोकांना हसवावे. म्हणून मी विनोदाकडे वळलो.'

किराणा दुकानातील नोकरीपासून ते स्थानिक बँडपर्यंत सर्व काही करून बघितले

कुटुंबातील सदस्य गमावल्याच्या दु:खातून सावरत असताना दादा कोंडके यांनी अपना बाजार नावाच्या किराणा दुकानातील नोकरी स्वीकारली. त्यांना तिथे महिन्याला 60 रुपये मिळायचे. मनोरंजनासाठी ते एका स्थानिक बँडमध्ये सहभागी झाले. इथेच त्यांना स्टेज शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. दादा इतके मृदुभाषी होते की यशानंतरही ते बँड सदस्यांना भेटायला जायचे. मराठी स्टारला पाहून बँड सदस्यांना वाटायचे की, त्यांना आपल्या छोट्याशा घरात कुठे बसवायचे, पण दादा त्यांना समजावून सांगायचे की मी आजही तोच माणूस आहे जो तुमच्यातूनच पुढे आला आहे.

नाटक करताना दादा कोंडके यांना महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांना भेटी देण्याची संधी मिळाली, जिथे त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची मागणी चांगल्या प्रकारे समजून घेतली. कोंडके हे सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा एक भाग होते, जिथे त्यांनी नाटकात काम केले. इथेच त्यांची मराठी रंगभूमीशी ओळख झाली आणि कोंडके यांनी स्वतःची नाट्यसंस्था सुरू केली.

नाटकात इंदिरा गांधींची उघडपणे खिल्ली उडवली होती

या नाटकाचे वर्णन काँग्रेसविरोधी असे करण्यात आले होते, ज्यामध्ये इंदिरा गांधींचीं खिल्ली उडवली गेली होती. एकीकडे नाटकाला पसंती मिळत असतानाच काँग्रेसविरोधी पक्षांनी दादा कोंडके यांना जोरदार पाठिंबा दिला. 1975 मध्ये हैदराबादमध्ये त्याचा शेवटचा प्रयोग झाला होता, त्यानंतर लगेचच आणीबाणी लागू झाली होती.

आशा भोसले यांनी चित्रपट निर्मात्याशी मैत्री करुन दिली आणि हीरो बनले

प्रसिद्ध गायिका आशा भोसले त्यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. दादांच्या मुंबईत होणाऱ्या 'विच्छा माझी पुरी करा'चा प्रत्येक शो पाहण्यासाठी त्या जात असत. दादा कोंडके यांच्या अभिनयाने खूश होऊन आशा ताईंनी त्यांची भेट मराठी चित्रपट निर्माते भालजी पेढाकर यांच्याशी घालून दिली.

भालजी पेढाकर यांनी दादा कोंडके यांना 1969 साली 'तांबडी माती' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1971 मध्ये दादांनी 'सोंगाड्या' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्यामध्ये त्यांनी स्वतः मुख्य भूमिका साकारली होती.

दादांच्या चित्रपटांवर सेन्सॉर बोर्डही नाराज होते

दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे शीर्षक आणि संवाद दुहेरी अर्थाचे असायचे. सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटांवर अनेकदा आक्षेप घेतला, पण दादांच्या विरोधात कोणीही आवाज उठवू शकले नाही. दादांकडे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे शीर्षक आणि संवादाबाबत त्यांच्याकडे काही ना काही उत्तरे असायची, ज्यापुढे सेन्सॉर बोर्डालाही नमते घ्यावे लागायचे.

बॉलिवूडमध्ये जादू चालली नाही तर मराठी चित्रपट हिंदीत बनवण्याचा ट्रेंड सुरू केला
मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाल्यानंतर दादा कोंडके 'तेरे मेरे बीच में', 'अंधेरी रात में दिया तेरे हाथ में', 'आगे की सोच' आणि 'ले चल अपने साथ' या हिंदी चित्रपटांमध्येही दिसले. त्यापैकी 'अंधेरी रात दिया तेरे हाथ में' हा चित्रपट खूप चर्चेत होता. कारण होते चित्रपटाचे दुहेरी अर्थाचे शीर्षक आणि दुहेरी अर्थाचे विनोदी संवाद. चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना मजेदार बनवण्यासाठी चित्रपटांमध्ये दुहेरी संवादांचा वापर ते करत होते. परंतु त्यांना बी किंवा सी ग्रेड अभिनेत्याचा दर्जा देण्यात आला होता. याचा राग म्हणजे दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट हिंदीत बनवण्याचा ट्रेंड सुरू केला.

धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या कलाकारांनीही दादा कोंडके यांच्या कामाचे कौतुक केले आहे. रेखा यांनी त्यांच्या 'भिंगरी' चित्रपटातील 'कुठे कुठे जायचं हनीमूनला' ही लावणी सादर केली होती. आशा भोसले यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे.

जेव्हा देव आनंद यांचे स्टारडम दादांसमोर फिके पडले
1971 मध्ये 'सोंगड्या' चित्रपटाची टक्कर तत्कालीन सुपरस्टार देव आनंद यांच्या 'तीन देवियां' या चित्रपटाशी झाली होती. दादरच्या कोहिनूर थिएटरच्या मालकाने देव आनंद यांचा चित्रपट ठेवण्याचा निर्णय घेतला, पण दादांनी 4 आठवड्यांपूर्वीच थिएटर बुक केले होते. थिएटर मालकाच्या हट्टी स्वभावामुळे व्यथित झालेल्या दादा कोंडके यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली.

स्वत: बाळ ठाकरे यांनी थिएटरबाहेर एक छोटा स्टेज बांधला आणि एका भाषणात थिएटर मालकांना विचारले, चित्रपट फक्त हिंदीतच प्रदर्शित होतात का, महाराष्ट्रात मराठी चित्रपट न दाखवून तुम्ही महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करत आहात. तुम्ही थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला स्थान दिले नाही, तरी आम्ही हा चित्रपट याच चित्रपटगृहात लावू. आम्ही तुमच्याकडून चित्रपटाचा अधिकार काढून घेतो. जर चित्रपट चालला नाही तर हे टॉकीज यापुढे टॉकीज राहणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.

सभांमध्ये गर्दी जमवण्याचे काम करायचे दादा
चित्रपटांव्यतिरिक्त दादा कोंडके यांनी शिवसेनेसोबत राजकारणात प्रवेश केला. दादा कोंडके यांची फॅन फॉलोइंग खूप होती आणि गरीब वर्गातील लोकांमध्ये त्यांची खूप क्रेझ होती. शिवसेनेच्या सभांना गर्दी जमवण्याचे काम दादांकडे असायचे. दादा सभेत आपल्या विनोदी भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकत असत.

मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे - कोंडके
राजकारणात असताना दादा कोंडके यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी घट्ट मैत्री होती. 80 च्या दशकात शिवसेना पुन्हा सरकार स्थापन करणार होती, तेव्हा ठाकरे आपल्याला आमदारकीचे तिकीट देतील, अशी दादांना आशा होती, पण त्यांची निराशा झाली. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मुलीला स्वतःचे नाव देण्यास दिला होता स्पष्ट नकार
दादा कोंडके यांचे लग्न नलिनी नावाच्या महिलेशी झाले होते, मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. नलिनी यांच्या दाव्यानुसार, त्यांचे आणि दादा यांचे कधीही शारीरिक संबंध नव्हते आणि 1967 पासून दोघे भेटले नव्हते. 1969 मध्ये नलिनी यांनी तेजस्विनी नावाच्या मुलीला जन्म दिला, जिला दादा कोंडके यांनी स्वीकारण्यास नकार दिला होता.

प्रसिद्धीझोतात आयुष्य जगणाऱ्या दादा कोंडके यांचा अखेरचा काळ एकाकीपणात गेला
दादा यांच्या कुटुंबात फक्त त्यांची बहीण होती, त्या पुण्याहून येताच दादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दादांना कायम लोकांच्या सहवासात राहायला आवडत असे. त्यांना लोकांशी बोलण्याची इतकी आवड होती की, ते लोकांवर यासाठी खर्च करायचे जेणेकरून त्यांना त्यांच्याशी बोलायला मिळावे. दादा कोंडके यांचा शेवटचा काळ त्यांच्या दादर येथील आलिशान पेंटहाऊसमध्ये घालवला होता.

ज्योतिषाने अपयशाचे केले होते भाकीत
दादा कोंडके यांनी स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ज्या ज्योतिषाने जन्माच्या वेळी त्यांची जन्मकुंडली पाहिली होती, त्यांनी आयुष्यभर अपयश येणार असे सांगितले होते, पण दादांनी प्रत्येक वळणावर आपल्या कर्तृत्वाने यशाचा आनंद लुटला.

बातम्या आणखी आहेत...