आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:विनोदवीर कुशल बद्रिकेने आपल्या खास शैलीत पोलिसांना म्हटले ‘दिल से थँक्यू’  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकताच कुशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला

अभिनेता अक्षय कुमारने #'दिल से थँक्यू' हा हॅशटॅग वापरत सर्वसामान्यांसाठी करोना विषाणूशी लढण्याऱ्या सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर अशा सर्वांचेच आभार मानले आहेत. विशेष म्हणजे अक्षयने या व्यक्तींचे आभार मानण्यसोबतच इतरांनाही या गोष्टीसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळेच त्याच्या या आवाहनाला पाठिंबा देत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर करोनाशी लढणाऱ्या लढवय्यांना 'दिल से थँक्यू' म्हणत आभार मानले. आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके यानेही त्याच्या खास स्टाईलमध्ये या लढवय्यांना 'दिल से थँक्यू' म्हटले आहे.   नुकताच कुशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केला असून त्याच्या हातामध्ये एका कार्डबोर्डवर दिल से थँक यू लिहिलेले आहे. कुशल सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचे मनापासून आभार मानतोय. कठीण परिस्थितीत स्वतःचा विचार न करता पोलीस बांधव अहोरात्र काम करून आपली सेवा करतात आहेत. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी कुशलने हा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.  

विशेष म्हणजे लोकडाऊन सुरु झाल्यापासून कुशल त्याच्या कुटुंबासोबत मिळून कोरोनाव्हायरसविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करतोय. त्याने त्याच्या कुटुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया’हे गाणे सध्या व्हायरल झाले. 

या गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कुशलने, पत्नी आणि मुलांबरोबर सादर केले. घरातल्या घरात आपल्या आवडत्या कलाकाराने सादर केलेले हे प्रयोग लोकांच्या भलतेच पसंतीस उतरले आहेत. लोकांच्या मनोरंजनासोबतच सध्याच्या परिस्थितीत लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, सरकार-प्रशासनातर्फे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी कशाप्रकारे साथ दिली पाहिजे, यावर प्रबोधन करण्याचा कुशलचा उद्देश प्रामुख्याने दिसून येतो.

'चला हवा येऊ द्या'चे विनोदवीर जितके विनोदी आहेत तितकेच संवेदनशीलदेखील आहेत हे यावरून स्पष्ट होते.    

बातम्या आणखी आहेत...