आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असतो. तो सतत नवीन पोस्ट शेअर करत नेटक-यांचे लक्ष वेधून घेत अशतो. सध्या त्याची एक पोस्ट लक्ष वेधून घेतोय. या पोस्टसह शेअर केलेल्या फोटोत कुशल विमानतळावर दिसतोय. कुशल आगामी 'बापमाणूस' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने लंडनला जातोय. लंडनला जाण्यापूर्वी त्याने कधीही कुठली गोष्ट एकट्याने केलेली नाही, पण लंडनला मात्र एकट्याने प्रवास करतोय, असे सांगितले आहे.
कुशल आपल्या पोस्टमध्ये लिहितो, 'मी एकट्याने कधीच सिनेमा पाहीलेला नाही, interval, मधला समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे असं मला नेहमी वाटत, एकटाच असा हॉटेलमध्ये जाऊन मी कधी जेवलेलो नाही, मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही, तसंच एकट्याने प्रवास करायलासुद्धा मला आवडत नाही, कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं.
पण आज सिनेमाच्या शूटिंगसाठी एकटं लंडनला जावं लागतंय, इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वीचा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते.
खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हवं यार. पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे, पण तरीही वाटतं….
किमान इंटरनॅशनल प्रवासामध्ये आपल्या वाट्याचे 2-peg प्यायला तरी कुणी हव होत…. Happy journey, To me." असे कुशलने म्हणतो.
कुशलच्या या पोस्टवर हेमांगी कवी, सुकन्या मोने, अभिज्ञा भावे यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच कुशलचे चाहतेदेखील त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.
पुष्कर जोगचा आगामी चित्रपट आहे 'बापमाणूस'
अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोगने दस-याच्या मुहूर्तावर त्याच्या आगामी बापमाणूस या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात पुष्कर जोगसह अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. दिग्दर्शन योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.