आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:हरहुन्नरी हौशी कलाकार पुंडलिक पालवे काळाच्या पडद्याआड, कोरोनामुळे मालवली प्राणज्योत

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुंडलिक पालवे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

'दशक्रिया', 'बंदिशाळा' या गाजलेल्या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका करणारे हौशी कलावंत पुंडलिक रामचंद्र पालवे यांचे रविवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते गेले 13 दिवस नाशिकमध्ये एका रुग्णालयात करोनावर उपचार घेत होते.

प्रसिद्ध लेखक संजय कृष्णाजी पाटील यांच्यासोबत त्यांचा जवळचा स्नेह होता. त्यांच्या 'दशक्रिया', 'बंदिशाळा' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी लहान लहान भूमिका केल्या होत्या. 'बंदिशाळा' या चित्रपटात पडद्यामागे राहूनही त्यांनी काम केले होते. तसेच गेली 30 वर्षे प्रशासकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मित्रत्वाच्या नात्याने ते संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे सहाय्यक लेखक म्हणून हौशेने काम पहात होते.

बातम्या आणखी आहेत...