आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनईचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर, आशुतोष कुलकर्णी यांच्यानंतर आणखी एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळने लग्न थाटले आहे. हे संग्रामचे दुसरे लग्न आहे. एका खासगी सोहळ्यात संग्राम लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
श्रद्धा फाटक हे संग्रामच्या पत्नीचे नाव असून ती एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा काही खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत इचलकरंजी याठिकाणी पार पडला.
2016मध्ये झाले होते पहिले लग्न
संग्रामचे 2016 मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी लग्न झाले होते. पल्लवी ही देखील मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘रुंजी’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली होती.
पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली होती. आणि दोघांनी अवघ्या आठ दिवसांतच लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. संग्रामचे आई-वडील अर्थात जेष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि अभिनेत्री संजीवनी समेळ हे दोघेही मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.
संग्रामने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘पुढचं पाऊल’, ‘ललित 205’, ‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या मालिकांसह त्याने ‘विकी वेलिंगकर’, ‘स्वीटी सातारकर’, ‘ब्रेव हार्ट’ या चित्रपटांत तो झळकला आहे. त्याचबरोबर ‘एकच प्याला’ या नाटकामध्येही त्याने काम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.