आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे स्पेशल:इंजिनिअर आहे शशांक केतकर, ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले आहे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे शिक्षण, जाणून घ्या इंट्रेस्टिंग गोष्टी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कवी मनाचा आहे शशांक केतकर...

मराठी मालिकांमधील हॅण्डसम अभिनेता शशांक केतकरचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेला शशांक अनेक मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत झळकला आहे. शिवाय मोठ्या पडद्यावरही त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आज शशांकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्याच्या खासगी आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी...

  • चतुरस्त्र शशांक

शशांक हा केवळ कलाकारच नाही तर तो एक उत्तम लेखक, कवी आणि राष्ट्रीय स्तरावरचा स्वीमर आहे. फोटोग्राफी, भटकंती हे शशांकचे आवडते छंद असून तो शाकाहारी आहे.

  • इंजिनिअर आहे शशांक

शशांकने ठाण्यातील व्हीपीएम पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुण्यातील के.डी. वाय. पाटील कॉलेजमधून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. मुळात इंजिनिअर असेलल्या शशांकने ऑस्ट्रेलियातून एमईएम (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट) केले आहे.

ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर शशांकने पुण्याचा सुदर्शन रंगमंच जॉईन केला. तिथे सचिन कुंडलकर दिग्दर्शित पूर्णविराम हे नाटक मिलाले. या नाटकाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला.

कालाय तस्मैः नमः ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन या मालिकांमध्ये त्याने छोटेखानी भूमिका साकारल्या. रंग माझा वेगळा ही शशांकची मुख्य भूमिका असलेली पहिली मालिका होती. मात्र शशांकला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे. या मालिकेत शशांकने श्रीरंग नावाच्या उद्योजकाची भूमिका साकारली होती. सध्या शशांक 'सुखांच्या सरीने हे मन बावरे' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.

शशांकने 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा प्रवेश केला. दोन पिढ्यांमधील अंतर हा या नाटकाचा विषय होता. 'कुसुम मनोहर लेले' या नाटकातही त्याने मुख्य भूमिका साकारली.

शशांकला मुक्या प्राण्यांबाबत खुप प्रेम आहे. भटकी कुत्री किंवा इतर प्राण्यांच्या हक्कासाठी तो सदैव कार्यरत असतो.