आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता उमेश कामतचा कायदेशीर कारवाईचा इशारा:राज कुंद्रा पोर्न प्रकरणात मराठी अभिनेता उमेश कामतला सहन करावा लागतोय मनःस्ताप, शहानिशा न करता वापरला गेला त्याचा फोटो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतने आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे. पॉर्न चित्रपट तयार करून ते अॅपवर स्ट्रीम केल्याचा त्याच्यावर आरोप असून न्यायालयाने 23 जुलैपर्यंत त्याला कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात राज कुंद्राचा सहकारी उमेश कामत यालाही अटक झाली आहे. पण याच नाव साधर्म्यामुळे मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत या मनःस्ताप सहन करावा लागत आहे. काही माध्यमांनी राज कुंद्राचा सहकारी उमेश कामत म्हणून अभिनेता उमेश कामतचा फोटो प्रसारित केला आहे. ज्यानंतर उमेश कामतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे. शिवाय त्याने याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

अभिनेता उमेश कामतने आपल्या संताप व्यक्त करताना सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी 'उमेश कामत' याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे.या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.'

उमेश कामतच्या या पोस्टनंतर मराठी कलाकारांसह त्याचे चाहते त्याच्या पाठिशी उभे आहेत. अभिनेता जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, सुयश टिळक, प्राजक्ता माळी, ऋजुता देशमुख, अमृता खानविलकर, रोहिणी निनावे यांच्यासह अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. 'अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कृपया योग्य ती कारवाई कर. आम्ही सर्व मित्र तुझ्या सोबत आहोत,' असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनेदेखील उमेश कामतला पाठिंबा देत म्हटले की, 'आम्ही तूझ्या बरोबर आहोत.. मी तुला लढ नाही म्हणणार.. आपण सगळे लढू आसं म्हणेन ..इतकी घाई??? इतका बेजबाबदार पणा?'

माध्यमांनी चुकीचा फोटो वापरत बातम्या दिल्यानंतरही चूक न सुधारता कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्याची खंत उमेश कामतने व्यक्त केली आहे.

राज कुंद्राच्या कार्यालयावर छापा; संगणक हार्डडिस्क, सर्व्हर जप्त
पॉर्न फिल्म तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी व्यावसायिक राज कुंद्राशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. पोलिसांनी मुंबईतील विआन इंडस्ट्रीज लिमिटेडचे ऑफिस तसेच इतर काही ठिकाणांवर छापे टाकले. ताज्या माहितीनुसार, कुंद्राच्या ऑफिसमधील काही कॉम्प्युटरच्या हार्डडिस्क व सर्व्हर जप्त करण्यात आले. असे मानले जात आहे की, येथूनच व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार याव्यतिरिक्त काही इतर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी कुंद्राचा एक आयफोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. ते तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणातील सर्व पीडितांची लवकरच चौकशी करू शकतात. असेही म्हटले जात आहे की, मुंबई पोलिस लवकरच थेट संबंध नसला तरी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करू शकतात.

पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा 7.21 कोटी रुपये गोठवले आहेत. पोलिसांना हॉटशॉट्स मोबाइल अॅपद्वारे बनवलेल्या कुंद्राच्या खात्यात बँक व्यवहार आढळला आहे. या खात्यातून दुसऱ्या एका खात्यातील अखेरचा व्यवहार जानेवारी 2021 मध्ये झाला होता. या मोबाइल अॅप खात्याचा वापर करणाऱ्या अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...