आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड:महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कलाकारांची श्रद्धांजली, म्हणाले - असा माणूस हा शतकांमधून एकदाच होतो

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन अतिशय प्रभावीपणे करणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वच स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. मराठी कलाकारांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांच अलौकिक चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'

अनेक मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर एका कार्यक्रमादरम्यान त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'आपला जाज्वल्य इतिहास अभिमानास्पद इतिहास जनतेसमोर मांडण्याचे काम त्यांनी केले. माझ्या पिढीला जी गोष्ट दिसली त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव अग्रक्रमाने घेणे हे आगत्याचे ठरेल. मी त्यांच्या प्रती व्यक्त केलेली एक कृतज्ञता ठरेल,' असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

अनेक ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी बाबासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 'बाबासाहेबांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाची वैयक्तिक हानी झाली आहे. शिवाय आपले सामाजिक नुकसानही झाले आहे. असा माणूस हा शतकांमधून एकदाच होतो आणि ती व्यक्ती आपल्यासोबच होती. त्यांचे आशिर्वाद आपल्यासोबत होते. हे खूप मोठे भाग्य होते असे मला वाटते,' असे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...