आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ह्यांची कळी कायमच खुलत रहावी!:मेहुलसोबत लग्नाच्या बेडीत अडकली अभिज्ञा भावे, बघा लग्नसोहळ्याचे खास क्षण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.

'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे बिझनेसमन मेहुल पैसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. दोघांच्याही लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावून नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

खुलता कळी खुलेना या मालिकेतील अभिज्ञाची सहकलाकार मयुरी देशमुख हिने अभिज्ञा आणि मेहुल यांच्यासोबतचा लग्नातील एक फोटो शेअर करुन 'ह्यांची कळी कायमच खुलत रहावी!', असे कॅप्शन दिले आहे.

लग्नात अभिज्ञाने पर्पल- पिंक कलरची डिझायनर नऊवारी साडी नेसली होती. तर मेहुलनेदेखील तिला मॅचिंग कपडे परिधान केले होते.

या लग्नसोहळ्याला अभिनेता संजय मोने, अभिनेत्री मयुरी देशमुख, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदेसह अनेक कलाकार हजर होते.

ऑक्टोबर महिन्यात अभिज्ञा आणि मेहुल यांचा साखरपुडा झाला होता.

विशेष म्हणजे अभिज्ञा आणि मेहुल या दोघांचाही पहिला घटस्फोट झाला असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे.

बातम्या आणखी आहेत...