आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहोचली अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान दोघांच्या घरीही लगीनघाई बघायला मिळतेय. बुधवारी अक्षयाच्या हातावर हार्दिकच्या नावाची मेंदी सजली तर नव-या मुलाला हळद लागली. आता अक्षयाच्या मेंदी सेरेमनीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
मेंदी सोहळ्याचा एक सुंदर व्हिडिओ अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अक्षयच्या हातावर आणि पायावर अत्यंत सुंदर अशी मेंदी काढल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, तिने हातावर सप्तपदी ही लिहिल्या आहेत.
मेंदी सोहळ्याला अक्षयाचे मनोरंजनसृष्टीतील मित्रमंडळीनेही हजेरी लावली. अभिनेत्री वीणा जगताप यावेळी हजर होती. अक्षयाने मेंदी सोहळ्याचे फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत.
अक्षयाने मेंदी सोहळ्यासाठी लव्हेंडर रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला. या ड्रेसवर तिने फुलांचे आकर्षक दागिने परिधान केले होते. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. आता काही तासांतच अक्षया आणि हार्दिक साता जन्माच्या गाठीत अडकणार आहेत. हळदी आणि मेंदी सेरेमनीनंतर आता चाहते हार्दिक आणि अक्षयाला वर-वधूच्या रुपात बघण्यास उत्सुक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.