आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली लग्नघटिका समीप:अक्षया देवधरने दाखवली लग्नपत्रिकेची झलक, लवकरच हार्दिक जोशीसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीच्या विणकामाचा श्री गणेशा करण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केला होता.

आता अक्षयाने लग्नपत्रिकेचा फोटो शेअर करत त्याला 'ऑन' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोला तिने ‘रांझणा’ या चित्रपटातील गाणे जोडले आहे. अक्षयाने इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. पत्रिकेवर अक्षया-हार्दिक असे लिहिलेले दिसत आहे. सोबत त्यावर चांदीचे पान आणि सुपारी ठेवलेली दिसत आहे. पण यासह अक्षयाने लग्नाची तारीख मात्र रिव्हील केलेली नाही.

मे महिन्यात झाला दोघांचा साखरपुडा
अक्षया आणि हार्दिक तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. मे 2022 मध्ये साखरपुडा चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.

काही दिवसांपूर्वीच अक्षया आणि हार्दिकच्या कुटुंबीयांनी अक्षयच्या साडीच्या विणकामाचा श्रीगणेशा केला. यावेळी हार्दिकनेही हातमागावर खास अक्षयसाठी पैठणी विणली होती. दोघांच्या कुटुंबासह अभिनेत्री वीणा जगताप, रुचा आपटे यांनीही अक्षयाच्या लग्नातील साडीचा एक धागा विणला होता.

अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले होते, "विणकाम सोहळा. ही पोस्ट शेअर करायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पण त्या दिवसाइतकीच ही पोस्टही मला परफेक्ट करायची होती. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्ही लग्नात नेसणार असलेल्या साडीतील एक धागा विणत आहेत, हे किती छान आहे. या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. या विणकाम सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार", असे ती म्हणाली होती.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर हार्दिक नुकताच ‘हर हर महादेव’ या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता त्याची आणखी एका ऐतिहासिक चित्रपटात वर्णी लागली आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये तो मल्हारी लोखंडे ही ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. हा चित्रपट दिवाळी 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अक्षयाने मात्र कामापासून थोडा काळ ब्रेक घेतल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...