आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रात्रीस खेळ चाले 2 मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.
शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे.
झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय' मध्ये लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेत अपूर्वा पम्मी हि व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झालीय.
या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी हि या मालिकेला ग्लॅमरचा तडक देणार आहे. हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
अपूर्वाची रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका सुपरहिट ठरली होती. यामधील तिचे शेवंता या पात्राने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.