आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला पितृशोक, कोरोनामुळे झाले वडिलांचे निधन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 मे रोजी अश्विनीच्या वडिलांचे निधन झाले.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार महागंडे यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, पण मंगळवारी (18 मे) त्यांची अखेरचा श्वास घेतला.

प्रदीपकुमार हे वाई जिल्ह्यातील पसरणी येथील ज्येष्ठ समाजसेवक होते. अश्विनीच्या अभिनेत्री होण्याच्या वाटचालीमध्ये तिच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. याआधी तिने झी मराठीवर गाजलेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्का साहेब ही भूमिका वठवली होती. या भूमिकेमुळे अश्विनीला लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्याशिवाय अश्विनीने मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. ‘टपाल’ आणि ‘बॉइज’ या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

बातम्या आणखी आहेत...