आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रौत्सवाचा जल्लोष:मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी साजरा केला पारंपरिक भोंडला, बघा फोटो

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींनी अलीकडेच एकत्र येत पारंपरिक भोंडला साजरा केला. ​​ अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याची आयोजन केले होते. कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या पण आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे. नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर, लीना नांदगावकर, सुप्रिया पाठारे, शिल्पा नवलकर, नियती राजवाडे, अदिती सारंगधर, वनश्री पांडे, मानसी नाईक, मेघा धाडे, पल्लवी प्रधान, सुलेखा तळवलकर, रोहिणी निनावे, कांचन अधिकारी, नितू जोशी, डॉ. पूर्णिमा म्हात्रे, रेखा सहाय, वनिता कुंभारे, सोनल खानोलकर उपस्थित होते.

या निमित्ताने नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...