आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणीतरी येणार येणार गं:अभिनेत्री धनश्री काडगावकरचे झाले डोहाळे जेवण, बघा सोहळ्याचे खास फोटो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनश्रीचे डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे. धनश्रीचे डोहाळे जेवण पार पडले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. धनश्रीसह तिचे पती ध्रुवेश देशमुख यांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सोहळ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी एक खास व्हिडिओ शेअर करुन धनश्रीने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. विशेष म्हणजे याच दिवशी तिचे पती ध्रुवेश देशमुख यांचा वाढदिवस होता आणि आयुष्यातील ही खास गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी तिने या खास दिवसाची निवड केली. लग्नाच्या जवळजवळ सात वर्षांनी धनश्री पहिल्यांदा आई होणार आहे.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले. दोघांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. ध्रुवेश धनश्रीपेक्षा वयाने चार वर्षांनी मोठा आहे. 10 ऑक्टोबर 1984 ही ध्रुवेशची तर 6 एप्रिल 1988 ही धनश्रीची जन्मतारीख आहे.

धनश्रीचे शिक्षण पुण्यातच झाले. गरवारे कॉलेज ऑफ कामर्स येथून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर IMCC येथून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी प्राप्त केली. झी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिअॅलिटी शोमधून धनश्री घराघरांत पोहोचली. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्याचा धनश्रीची विचार नव्हता. पण आईच्या आग्रहामुळे ती या शोमध्ये सहभागी झाली आणि 24 स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली होती. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर धनश्री या शोच्या टॉप 10 स्पर्धकांमध्ये पोहोचली.

'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मुळे धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली. तर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील नंदिता गायकवाडच्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 'झोपी गेलेला जागा झाला' आणि 'आधी बसू मग बोलू' या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

दासबाबू दिग्दर्शित 'ब्रेव्हहार्ट' या चित्रपटातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. शिवाय तिचा 'चिठ्ठी' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser