आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण घरात अडकला आहे. मात्र या काळात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होते. या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत होते. यात मराठी कलाकाही कुठेच मागे नव्हते. अनेक जण इन्स्टाग्राम, फेसबुकवरुन रोज प्रेक्षकांची भेट घेत होते. यामध्ये अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हिनेदेखील ‘मधुरव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांची भेट घेत होती.
View this post on InstagramA post shared by Madhura Welankar-Satam (@madhurawelankarsatam) on Jun 16, 2020 at 2:21am PDT
मधुरा वेलणकर-साटमने 17 एप्रिल रोजी ‘मधुरव’ या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. फेसबुकच्या माध्यमातून तिने हा कार्यक्रम सुरु केला होता. परंतु 17 यशस्वी भागांनंतर आता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन सुरु झालेल्या या कार्यक्रमाती सांगतादेखील त्याच पद्धतीने होणार आहे.
या सांगता सोहळ्याला मधुराने ‘मधुरव सांगता सोहळा’ किंवा ‘मधुरव फिनाले फेस्टिव्हल’ असं नाव दिलं असून या कार्यक्रमात दिग्गज व्यक्ती प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हा सोहळा येत्या शुक्रवार ते रविवार म्हणजे 19-20 आणि 21 जून या तीन दिवसात होणार आहे. या तीनही दिवशी मान्यवर व्यक्ती प्रेक्षकांची भेट घेतली.
मधुराने सुरु केलेला मधुरव हा कार्यक्रम दर शुक्रवार आणि रविवार अशा दोन दिवशी संध्याकाळी 6 वाजता सुरु व्हायचा. या कार्यक्रमात मधुरा फेसुबक लाइव्हच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहित्य कृतींचं वाचन करत असून ज्या लेखकाची साहित्यकृती मधुरा वाचायची, त्या लेखकांची आणि प्रेक्षकांची फेसबुक लाइव्हच्याच माध्यमातून भेटही घडवून देत होती. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
डिजिटल मीडियावर आगळा वेगळा उपक्रम म्हणून “मधुरव” नावाजला जात आहे. “मधुरा वेलणकर साटम” या यूट्यूब चॅनेल वर देखील हे भाग उपलब्ध होणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.