आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलरवर भडकली मानसी नाईक:‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिले?’, मानसीने ट्रोलरला सुनावले

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी लग्नावरुन देखील यूझरने केले होते मानसीला ट्रोल

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक हिला अलीकडेच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अलीकडेच एका लाइव्ह सेशनमध्ये मानसीने तिला ट्रोल करणाऱ्याला सडेसोड उत्तर दिले आहे. त्यामध्ये ट्रोलिंगचा अनुभव सांगताना ती म्हणाली, 'काही दिवसांपूर्वी माझ्या एका फोटोवर यूझरने मी बुधवार पेठेतील आहे, अशी कमेंट केली होती. ती कमेंट पाहून मला हसूही आले आणि वाईट ही वाटले,' असे मानसी म्हणाली.

यूझरच्या घाणेरड्या कमेंटला उत्तर देताना मानसी म्हणाली, 'तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितले? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात. त्या त्यांच्या हिंमतीवर जगतात. प्रामाणिकपणे काम करतात. त्या स्त्रिया तिथे का आल्या असे तुम्हाला वाटते? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून काय मिळते?,' असे अनेक प्रश्न विचारत तिने त्या युझरला सुनावले आहे. कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ करणे हे चुकीचे आहे, असेही मानसीने म्हटले आहे. बुधवार पेठ हा पुण्यातील रेड-लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महिला वेश्या व्यवसाय करतात.

  • लग्नावरुन देखील यूझरने केले होते मानसीला ट्रोल

मानसीने यावर्षी 19 जानेवारी रोजी बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्न केले. नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते. पण लग्नानंतर देखील मानसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तुला मराठी मुलगा भेटला नाही का? असे तिला विचारण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...