आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंगेज्ड:मराठी अभिनेत्री मानसी नाईकचा झाला साखरपुडा, जाणून घ्या तिच्या जोडीदाराविषयी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे.

मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मानसी नाईकचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करुन मानसीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिले आहे.

कोण आहे प्रदीप खरेरा?
मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असूनत्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. याशिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रदीप खरेराचं इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.

साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर मानसी आणि प्रदीप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सध्या दोघांनीही त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...