आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी झाले होते मृणाल कुलकर्णींचे लग्न, पतीसोबतचे खास फोटो शेअर करुन म्हणाल्या... 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे फोटो पोस्ट केल्यानंतर मृणाल कुलकर्णी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कसदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणा-या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अ‍ॅडव्होकेट रुचिर कुलकर्णी यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.10 जून 1990 रोजी वयाच्या अवघ्या 19 वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले होते.

आजच्या या खास दिनाचे औचित्य साधत मृणाल यांनी रुचिर यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 'नात्यातलं मैत्र टिकवणं जमलंय याचा आनंद सगळ्यात मोठा...', असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. 

लग्न झाल्यानंतर खर्या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 21 जून 1971 रोजी पुण्यात जन्मलेल्या मृणाल यांचे माहेरचे आडनाव देव हे आहे. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव या त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ.विजय देव पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

मृणाल बारावीत शिकत असताना त्यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. पण त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावे असे डोक्यातही नव्हते. केवळ संधी मिळाली म्हणून काम केले होते, असे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितले.

एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा देताना मृणाल म्हणाल्या होत्या, माझा सुखाचा प्रवास घरापासून सुरू होतो आणि घरापाशीच संपतो. माझ्या करिअरची सुरुवात झाली तीच मुळी लग्नानंतर. बारावीत असताना ‘स्वामी’; केलं. पण त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावं असं डोक्यातही नव्हतं. केवळ संधी मिळाली म्हणून काम केलं होतं. पण लग्न झाल्यानंतर खर्या अर्थानं या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले.  मुलगा विराजस पोटात असताना मी ‘श्रीकांत’; नावाची मालिका करत होते. या मालिकेत माझी बंगाली स्त्रीची भूमिका होती. त्यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे सात महिन्यांची गरोदर असेपर्यंत मी काम करू शकले. बाळंतपणाच्या निमित्ताने थोडी विश्रंती घेतली आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या आधारे पुन्हा जोमाने कामाला लागले. मृणाल यांचा मुलगा विराजस आता 28 वर्षांचा झाला आहे. तो मोठा होईपर्यंत मृणाल त्याला शूटिंगसाठी घेऊन जात होत्या. त्यामुळे तो या क्षेत्राशी जवळून परिचित झाला. ​

विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाय सुभाष घईंच्या विस्लिंग वूड या संस्थेतून त्याने फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’;चे दिग्दर्शक सिद्धार्थ बसू यांच्यासोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली. अलीकडेच त्याने माझा होशील ना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल टाकले आहे. 

मृणाल यांनी मुलाखतीत सांगितले होते, मला कधीच लग्न झालं आहे, मला मूल आहे हे लपवण्याची आवश्यकता वाटली नाही. मी नॉनस्टॉप काम करू शकले याचं श्रेय सासूबाई आणि पतीला जातं. पतीने या प्रवासात मोलाची साथ दिली. तेव्हा मी मुंबईला आणि तो पुण्याला अशी परिस्थिती होती. मला यायला जमलं नाही तर तो मुलाला घेऊन मुंबईला यायचा आणि माझी बेचैनी दूर करायचा. 

मृणाल म्हणतात, माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निखळ आहे. त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. लेक, पत्नी, सून आणि आई म्हणून यश मिळाल्याने आतापर्यंतचा प्रवास अगदी सुखद आहे. 

बातम्या आणखी आहेत...