आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिची स्वप्नपूर्ती झाली आहे. ऋतुजाने मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेतले आहे. सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडिओत ऋतुजा नवीन घरात प्रवेश करताना दिसत आहे. घराच्या पाटीवर ऋतुजा बागवे नावाची पाटी दिसतेय.
व्हिडिओला दिले खास कॅप्शन
ऋतुजाने हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना त्याला खास कॅप्शन देखील दिले आहे. ती लिहिते, "शाळेत असताना बाबा ५ रू. पॉकेट मनी द्यायचे. 3 रू. खर्च करुन 2 रू. पिगी बँकेत ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता 5 रू. पिगी बँकेत टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, small sacrifices, आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं. घर आणि घराला घरपण देणारी माझी माणसं," अशा शब्दांत ऋतुजाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेलेल्या या व्हिडिओत तिच्यासह तिचे आईवडील आणि घरातील इतर सदस्य दिसत आहेत.
2008 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण
ऋतुजाने 2008 मध्ये 'ह्या गोजिरवाण्या घरात' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले. ऋतुजाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे. यामध्ये तिने स्वानंदी देशपांडे ही भूमिका साकारली होती. ही मालिका 2015 मध्ये झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाली होती. त्यानंतर ऋतुजाने 2021 मध्ये प्रसारित झालेल्या 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. या मालिकेत तिच्याबरोबर सुबोध भावे, आस्ताद काळे हे कलाकार होते. छोट्या पडद्यासोबत ऋतुजा रंगभूमीवरही रमते. तिची प्रमुख भूमिका असलेले 'अनन्या' हे नाटक खूप गाजले. या मालिकेत तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे. याशिवाय काही वेब सिरीजमध्येही ऋतुजा झळकली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.