आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर येत्या 30 नोव्हेंबर रोजी लग्नगाठीत अडकणार आहे. तत्पूर्वी तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतेच सईने घरी पार पडलेल्या देवकार्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
27 नोव्हेंबर रोजी देवकार्य पार पडले. देवकार्यासाठी सईने जांभळ्या रंगाची खणाची साडी नेसली असून त्यावर तिने मोत्यांचे दागिने घातले आहेत.
पारंपरिक रुपात सईचे सौंदर्य अधिकच खुलून आलेले आहे.
देवकार्यासाठी तिचा होणारा पती तिर्थदीप रॉय याने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला. तिर्थदीप व आई-बाबांसोबतचे हे फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आज (28 नोव्हेंबर) सईचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 29 नोव्हेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम असेल. 30 नोव्हेंबर रोजी लग्न आणि याच दिवशी रिसेप्शनही होणार आहे.
जाणून घ्या सईविषयी...
सई लोकूरने 'कुछ तुम कहो कुछ हम कहे' या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. फरदीन खान नायक असलेल्या या चित्रपटात सईने फरदीनच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. इतकेच नाही तर 'पकडा गया' या सई परांजपे यांच्या तर 'मिशन चॅम्पिअन' या तिच्या आईच्याच प्रॉडक्शनचा चित्रपटात सईने बालकलाकार म्हणून काम केले आहे.
हिंदी चित्रपटातही केले आहे काम
सईने 2015 साली आलेल्या 'किस किस को प्यार करु' या चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत भूमिका केली होती. यात सईने त्याच्या पत्नीची भूमिका केली होती. सईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि आईच्या मार्गदर्शनाखाली सईने अनेक नाटकांत काम केले आहे. सईची आई वीणा लोकूर या प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत.
या चित्रपटात केले आहे काम
सईने आतापर्यंत प्लॅटफॉर्म, आम्ही तुमचे बाजीराव, पारंबी, जरब, मी आणि यु या चित्रपटांत काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.