आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे शर्मिष्ठा राऊत:रोखठोक मत मांडते शर्मिष्ठा, दिग्दर्शकावर केला होता पैसे थकवल्याचा आरोप, जाणून घ्या शर्मिष्ठाबद्दल काही खास गोष्टी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शर्मिष्ठाने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत.

मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा आज वाढदिवस असून नेहमीपेक्षा हा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास आहे. कारण शर्मिष्ठा लग्नानंतरचा आपला पहिला वाढदिवस साजरा करत आहे. मागील वर्षी 11 ऑक्टोबर रोजी शर्मिष्ठा तेजस देसाईसोबत विवाहबद्ध झाली आहे. जाणून घेऊयात शर्मिष्ठाबद्दलच्या काही खास गोष्टी...

22 एप्रिल 1984 रोजी ठाण्यात शर्मिष्ठाचा जन्म झाला. सरस्वती विद्यामंदिर ठाणे येथून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे वडिलांच्या व्यवसायामुळे नाशिकला हे कुटुंब स्थलांतर झाले. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले असून नाशिकमधूनच तिने आपले बी कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे. सातवी इयत्तेत असताना तिने नाटकांमध्येदेखील सहभाग दर्शवला आणि तेव्हापासूनच या क्षेत्रात तिने यायचे ठरवले.

'मन उधाण वाऱ्याचे‘, ‘जुळून येती रेशीम गाठी‘, ‘उंच माझा झोका‘, 'कुंपण', 'सप्तपदी', 'चार दिवस सासूचे', 'अभिलाषा', 'एक झुंज वादळाशी', ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या शर्मिष्ठाच्या गाजलेल्या मालिका आहेत.

मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील शर्मिष्ठाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. फक्त लढ म्हणा, चि व चि सौ. कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली. एक पेक्षा एक, फु बाई फु, कॉमेडी एक्स्प्रेस या रिऍलिटी शोमध्ये देखील तिने सहभाग नोंदवला आहे. ‘आज काय स्पेशल’ या कुकरी शोचे सूत्रसंचालनही ती करत होती, ‘बिग बॉस मराठी’मुळे तिला खरी ओळख मिळाली आणि ती घराघरांत पोहोचली.

तेजस देसाईसोबत थाटले दुसरे लग्न
शर्मिष्ठाने गेल्यावर्षी 11 ऑक्टोबर रोजी तेजस देसाईसोबत दुसरे लग्न थाटले. शर्मिष्ठाचे तेजससोबतचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्यासोबत झाले होते. पण काही कारणांमुळे त्यांचा संसार टिकू शकला नाही. या गोष्टींचा स्वत: शर्मिष्ठाने 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये असताना खुलासा केला होता. शर्मिष्ठा आणि अमेय यांचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांच्या परवानगीने त्याचे लग्न झाले होते. मात्र आयुष्यात काही निर्णय चुकतात तसा लग्नाचा निर्णय चुकल्याचे तिने या शोममध्ये म्हटले होते. घटस्फोट झाल्यानंतर ती एका मानसिक तणावातून गेल्याचेही शर्मिष्ठाने सांगितले होते.

दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर केला होता पैसे थकवल्याचा आरोप
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर शर्मिष्ठा राऊतने 'मन हे बावरे' या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप केला होता. चॅनेलचा उत्तम सपोर्ट असूनही कलाकार आणि तंत्रज्ञांना योग्य मोबदला मिळत नसल्याचे शर्मिष्ठा राऊतने म्हटले होते. आपलेच पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागत असल्याचे शर्मिष्ठा म्हणाली होती. शर्मिष्ठाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन हे प्रकरण सर्वांसमोर आणले होते. ‘मन हे बावरे’ या मालिकेतील मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही शर्मिष्ठाची पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...