आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे कॉमेडी क्वीन:गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया, अशी आहे विनोदाच्या राणीची लव्ह स्टोरी

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निखिलचे हे लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट होते. तर श्रेयासाठी हे मुळीच लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट नव्हते.

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सेठ हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात एका मराठी कुटुंबात जन्मलेली श्रेया गुजराती कुटुंबाची सून आहे. श्रेयाचे लग्न निखिल सेठसोबत झाले आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. महाराष्ट्रीय पद्धतीने श्रेयाचे गुजराती असलेल्या निखिलसोबत लग्न झाले होते.

श्रेयाविषयी जाणून घेऊयात...

श्रेया मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. आठवीत असताना बाललैंगिक शोषणावर ‘वाटेवरच्या काचा गं’ हे छोटसे प्रबोधनपर नाटक केले होते. या नाटकाचे प्रयोग करण्याकरता श्रेया इतरांबरोबर सगळीकडे फिरली. शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयानं अनेक बालनाट्यात काम केलं होतं. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजसाठी काहीतरी करायचं अशा विचारातून तिनं कॉलेजच्या अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मराठीतच नाही तर गुजराथी नाटकांमध्येही काम केले आहे.त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फु बाई फू या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

पहिल्याच भेटीत श्रेयाच्या प्रेमात पडला होता निखिल

'बैरी पिया' या मालिकेत निखिलने श्रेयाला पहिल्यांदा बघितले होते. त्यानंतर 'मांडला दोन घडीचा डाव' या मालिकेसाठी निखिलनेच श्रेयाचे नाव सुचवले होते. श्रेया आणि निखिलची पहिली भेट 2011 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. हे दोघेही 'मांडला दोन घडीचा डाव' या मालिकेत काम करत होते. श्रेयाची मालिकेत महत्त्वाची भूमिका होती. तर निखिल मालिकेच्या क्रिएटीव्ह टीमचा भाग होता. येथेच दोघेही पहिली भेट झाली होती.

श्रेया उद्धट वाटला होता निखिल

पहिल्या भेटीत उद्धट अशी निखिलची इमेज श्रेयासमोर उभी झाली होती. पण हळूहळू निखिल श्रेयाच्या मेकअप रुममध्ये येणे सुरु केले. तिथे आल्यानंतर निखिल श्रेयाची डायरी वाचायचा. त्यावेळी का हा मुलगा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय, अशी श्रेयाची रिअॅक्शन होती. मालिका सुरु झाल्यानंतर पाच महिन्यांनी निखिलने ही मालिका सोडली. त्यानंतर दोघांचा काहीच संपर्क आला नाही. काही महिन्यांनी 'गुंतता हृदय ही' मालिका सुरु झाली. या मालिकेचा निखिल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता. मालिकेच्या नामावलीत निखिलचे नाव बघून श्रेयाने त्याला फोन केला आणि मालिकेचे प्रोमो छान झाले, अशी कॉम्प्लिमेंट दिली. त्यावेळी मालिकेचे पहिले शेड्युल संपले असून मी पुण्यात आलोय, असे निखिलने श्रेयाला सांगितले. या फोन कॉलनंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्याकाळात निखिलचे घरचे त्याच्या लग्नासाठी मुली शोधत होते. एकेदिवशी निखिलने श्रेया तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर श्रेयाने हो उत्तर दिल्यानंतर निखिलने तिला लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या सहमतीने दोघांचे लग्न झाले. निखिलचे हे लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट होते. तर श्रेयासाठी हे मुळीच लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट नव्हते.

मराठी इंडस्ट्रीतील सेलेब्सची होती हजेरी

श्रेयाच्या लग्नाला मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता पियुष रानडे श्रेयाचा मानलेला भाऊ आहे. तिच्या मेंदी, संगीत, हळदीपासून ते लग्न पाठवणीपर्यंतच्या सर्व विधींना पियुष हजर होता. शिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रेयाची अतिशय जीवाभावाची मैत्रीण आहे. तिच्या लग्नाच्या प्रत्येक विधीला तेजस्विनीनेसुद्धा उपस्थिती लावली होती. याशिवाय आनंद इंगळे, मृणाल दुसानिस, अभिज्ञा भावे, प्रिया मराठेसह अनेक सेलिब्रिटी श्रेया आणि निखिल यांना शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.

निर्माता आहे निखिल सेठ​​​​​​​

सासूसासरे, नवरा आणि नातेवाईकांसोबत श्रेया
सासूसासरे, नवरा आणि नातेवाईकांसोबत श्रेया

श्रेयाप्रमाणेच निखिलचेही एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीसोबत घट्ट नाते आहे. अनेक मराठी मालिकांची निर्मिती निखिलने केली आहे.