आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एका पत्नीला आपल्या पतीमध्ये काय हवं असत? रुबाबदार दिसणारा अभिनेता, सिंघम सारखा पोलीस अधिकारी, शांतता प्रिय अध्यात्मिक गुरू किंवा दबदबा असणाऱ्या राजकारण्यासारखा कोणीतरी. आणि मग अशा अनेक गगनउंची गाठलेल्या अपेक्षांसह, प्रत्येक पत्नीला असे वाटते की, देवाने तिच्याच पती मध्ये हे सर्व गुण का नाही दिले. अशीच एमएक्स प्लेयर एक्सक्लूझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल 'बायकोला हवं तरी काय' या वेब सीरिजची विनोद आणि मनोरंजनाची पर्वणी सुरू झाली आहे. 4 डिसेंबरपासून एम एक्स प्लेयर वर या सीरिजचे सर्व भाग प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. या सीरिजमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे हिने गृहिणीची भूमिका वठवली आहे. या निमित्ताने तिच्याशी झालेला हा खास संवाद...
'बायकोला हवं तरी काय' ही 4 तारखेपासून आमची वेब सीरिज एम एक्स प्लेअरवर लाईव्ह झाली आहे, आणि बऱ्याच काळानंतर एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती माझं पाहिलंच काम आहे आणि बरीच वर्ष मला लोकं विचारत होती की, 'चला हवा येऊ द्या'नंतर व्हॉट नेक्स्ट?, तर खूप छोट्या छोट्या ऍड फिल्म्स आणि इतर अनेक ठिकाणी मी दिसत होते, बट आय वॉज ऑल्सो वेटिंग फॉर द अपॉर्च्युनिटी अँड द राईट प्रोजेक्ट टू कम अलोंग, आणि सेम टाईम MX कडून आणि राणी बुग्वे, अनिश जोग जे ही सीरिअल प्रोड्युस करत आहेत. त्यांच्याकडून विचारण्यात आलं की, प्रियदर्शन जाधव हा ही सीरिअल डायरेक्ट करतो आहे, अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी ही सीरिअल लिहिली आहे आणि अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्यासारख्या स्टार्स बरोबर मला काम करायला मिळणार आहे, सो देर वॉझ नो वे आय कूड रिफ्युझ इट. अशा प्रोजेक्टची मी वाट बघत होते अँड इट केम अलोंग.
मला वाटतं की, खरं तर OTT वरती पण लॉकडाऊनमध्ये सुद्धा लोकांनी खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरच्या वेगवेगळ्या विषयांवरती सीरिज पहिल्या होत्या, नव्हतं ते सगळा कंटेंट लोकांनी बघितलाय, आणि OTT म्हटलं की आज काल लोकांना काहीतरी डार्क व्हॉयलेन्ट, सेक्स, ड्रग्सशी रिलेटेड कंटेंट असेल असं वाटतं. पण या काळात पण काही उत्तमोत्तम सीरिज आल्या आहेत. पण हे सगळं फॅमिलीसोबत, ऑल एज ग्रुप्सना सगळ्यांना घेऊन बसून बघतोय असं होत नाही. मग कोणीतरी आतल्या रूममध्ये जाऊन बघतं, कोणी लॅपटॉप वरती बघतं.. अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. मला असं वाटतं 2020 मध्ये नेगेटिव्हिटीने घेरलो गेलो होतो. आपण सगळे आता हळूहळू त्यातून बाहेर येतोय. पण सगळी जणं त्यातून बाहेर आलेली नाही आहेत. पीपल आर स्टील स्ट्रगलिंग विथ डेली लाईव्हलिहूड, हेल्थ इश्यूज, फायनान्शिअल इशूज, मेंटल इश्यूज. तर मला असं वाटतं की 'बायकोला हवं तरी काय' या वेब सीरिजची USP ही आहे कि ती एक लाईट हार्टेड... खूप एका लायटर नोट वरची, मूड वरती नेणारी, नवरा बायकोची गोष्ट. आणि तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं असेल की, कृष्ण देव आहे या मालिकेत. इट्स अ ब्रीधार. या सर्वातून डोकं बाजूला ठेऊन छान काहीतरी लाइट मूड वरती अनुभवावं, निव्वळ एंटरटेनमेंट हा या मालिकेचा हेतू आहे. आपण सगळे जणं आतुरतेने वाट बघतोय ते हे वर्ष संपायची... मार्चपासून आपण सगळे हेच म्हणतोय की 2020 आता संपावं, सो जाता जाता आमच्याकडून ही प्रेक्षकांना दिलेली भेट आहे. की या एका खूप पॉझिटिव्ह नोटवरती हे वर्ष आपण संपवूया आणि येणारं वर्ष हसत सुरु करूया.
नाही. निखिल दादाबरोबर मी चाईल्ड आर्टिस्ट म्हणून खूप वेळा काम केलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी लाइफ हॅस कम अ फूल सरकल. या सीरिजमध्ये इतक्या वर्षांनी मी पुन्हा काम केलं. अनिकेत बरोबरसुद्धा मी पोस्टर बॉईझमध्ये काम केलं आहे. आणि जनरली काय होतं की चला हवा येऊ द्या च्या सेटवर या लोकांच्या भेटी गाठी होत राहतात कारण ते वेगवेगळे प्रोजेक्ट्सवर काम करत असताना गेस्ट म्हणून येत असतात. पण एका सेटवर त्यांच्याबरोबर काम करणं हा वेगळा अनुभव असतो. अनिकेत आणि निखिल दादा या दोघानां आधीपासून ओळखत असल्यामुळे अनोळखीपणा किंवा नवीन कुठल्या तरी आर्टिस्ट बरोबर काम करण्याचं फीलिंग नव्हतं. आणि दर्शन होता कॅप्टन ऑफ द शिप. त्यामुळे हे सगळे आधीपासून खूप चांगले मित्र होते आणि ही सगळी गँग एकत्र आल्यावर काय होणार ना? बऱ्याच वेळा असा व्हायचं की खूप दंगा मस्ती व्हायची आणि मग दर्शन म्हणायचा की चला आता मला शेड्युल संपवायचं आहे, तुम्ही मस्ती नंतर करा. तर खूप मस्ती केली धमाल केली आम्ही सेट वर.
लाइक आय सेड, मी अशा अपॉर्च्युनिटीची वाटच बघत होते आणि OTT चं काय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. इट इझ अ बूमिन्ग इंडस्ट्री राइट नाव्ह आणि कुठल्यातरी एका प्लॅटफॉर्म आपलं दिसणं आपलं असणं हे तुमच्या करिअरसाठी पण एक खूप मोठा पुश ठरू शकतो. इफ यु आर इन द राइट प्रोजेक्ट ऑन द राईट प्लॅटफॉर्म आणि MX सारखा प्लॅटफॉर्म जो लोकांनसाठी फ्री अव्हेलेबल आहे. तुम्हाला काहीच करायला लागत नाही. फक्त डाउनलोड करून निःशुल्क वापरू शकता. लोकांसाठी तर ही अगदी ट्रीट अशा प्रकारच्या त्यांच्या सीरिअल्स आहेत आणि आता ही आमची एक ऍडिशन झाली आहे. सो आय वॉझ लूकिंग फॉरवर्ड टू इट. TV सोडून मला एका वेगळ्या प्लॅटफॉर्म वर दिसायचं होतं आणि नाटक आणि सिनेमा आता हळूहळू चालू होत आहेत त्यामुळे त्यात इतक्या पटकन झेप घेऊन काही होईल असा आताचा सिनॅरिओ नाही आहे. थँकफुली लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी आमची सीरिज शूट झाली होती आणि लॉकडाऊन संपता संपता ती ऑन एअर जातेय या सारखी दुसरी गोष्ट काहीच होऊ शकत नाही.
खरं तर दर्शन स्वतः हा एक खूपच अमेझिंग, ब्रिलिअंट, वरच्या क्लासचा अॅक्टर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याचं कॉमेडीचं टायमिंग कॉमेडीचं लिखाणसुद्धा आपण या आधी अनेक प्लॅटफॉर्म्सवरून बघितलेलं आहे ऐकलेलं आहे. त्यामुळे अशा एक अॅक्टर टर्न्ड डायरेक्टरबरोबर काम करताना एक खूप वेगळी मज्जा येते. म्हणजे एक तर त्याला त्या फॉर्मची त्या जॉनरची खूप चांगली जाण आहे. कारण त्यांनी स्वतः ते केलेलं आहे, त्यामुळे जेव्हा तो तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो काहीतरी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, की त्याला काय हवंय. त्या अनुषंगाने सुद्धा तो विचार करत असतो की मी या जागी असतो तर मी काय विचार केला असता हे वाक्य लिहिताना की हा सीन करताना. सो मला कॉन्वे करताना ते खूप इझी होऊन जातं आणि दर्शन हा खूप सॉर्टेड आहे. कितीही स्ट्रेस असला तरी तो स्ट्रेस आर्टिस्टवरती येऊ देत नाही. एका दिग्दर्शकावर खुप जबाबदा-या असतात - शेड्युल संपवायचे आहे, लाइट संपतोय, पॅकअपचं टायमिंग जवळ आलय, ऑल ऑफ दॅट. लास्ट मोमेन्ट पण खूप क्रायसिस येतात पण तो खूपच थंड डोक्याने त्या सगळ्या गोष्टी हॅन्डल करून, तुम्ही मज्जा करत करतच काम करा या लेवल वरती तो करतो. सो एक अॅक्टर म्हणून सुद्धा तुम्ही एका कम्फर्ट झोनमध्ये असता आणि तुमच्या कडून चांगला काम निघत.
मला असं वाटतं की एक एपिसोड दुसऱ्यासारखा नव्हता, त्यामुळे एकाच सीरिजमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्याचा आनंद मिळाला. एरवी एका सीरिजमध्ये आपलं एक कॅरॅक्टर असतं आणि त्या प्रमाणे आपण करत जातो तर तसं नसून आपण इथे पाहतोय की अनिकेत वेगवेगळ्या रूपात आहे आणि मला त्याला रिस्पॉन्ड पण वेगवेगळ्या पद्धतीने व्हायचंय. माझी भूमिका बदलत गेली आहे - टू कॉम्प्लिमेंट हिज रोल. मी या सीरिअलमध्ये रिसिविंग एन्डला आहे, जे मी नॉर्मली करते की वेष बदलून वेगवेगळ्या भूमिका करते ते. या वेळेला अनिकेत करतोय अँड आय एम ऐट द रिसिविंग एन्ड व्हेर आय एम जस्ट रिऍक्टिंग टू द मॅडनेस. ते जास्त चॅल्लेंजिंग होतं माझ्यासाठी.
(हसत) मला नेहमी असं वाटत असतं पण तो कृष्ण येणार नाही आहे. सगळ्या लग्न झालेल्या बायका माझ्याबरोबर अॅग्री करतील की मनातनं दोघांची ही इच्छा आहे. कधी कधी होते की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बायकोने असं करावं, तसं करावं. बट ऐट द एन्ड ऑफ द डे ती जी कंपॅनिअनशिप असते, ती. जी कंपॅटिबिलिटी असते दॅट इस बिकोझ वी आर ऍक्सएप्टिन्ग इच अदर द वे वी आर. अपेक्षा तर असणारच आहेत, ते सगळ्या नात्यांमध्ये असतात. पण नवरा बायकोचं नातं हे खूप मॅजिकल असतं कारण एकाच नात्यात आपण इतके रोल्स प्ले करत असतो. कधी तो आपला नवरा बनतो, कधी तो आपला बाप बनतो, कधी तो आपला भाऊ बनतो, कधी तो आपला मित्र बनतो, कधी तो आपला बॉयफ्रेंड बनतो, कधी तो आपला कलीग बनतो, तर माझा नवरा न मागताच हे सर्व रोल्स प्ले करतो. व्हेन आय वॉन्ट अ, फ्रेंड ही इज अ फ्रेंड, व्हेन आय वॉन्ट समबडी टू टेक केयर ऑफ मी, ही इज लाइक अ फादर टू मी, व्हेन आय वॉन्ट समबडी टू प्रोटेक्ट मी ही इज अ ब्रदर टू मी, त्यामुळे मला कधी करिअर रेलटेड अॅडवाईस हवी असेल तेव्हा तो माझा मेंटॉर बनतो... सो सगळ्यांचं तसचं असतं ना?
बघा 'बायकोला हवं तरी काय?' या वेब सीरिजचा ट्रेलर...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.