आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे:मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आहे पत्रकार, नीट मराठी बोलता येत नव्हते; अशी मिळाली होती पहिल्या मराठी चित्रपटाची ऑफर 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 18 मे 1988 रोजी जन्मलेली सोनाली मुळची पुण्याची आहे.

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 32 वर्षे पूर्ण केली असून तिशीत पदार्पण केले आहे.

गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी. मराठीच नव्हे तर 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' या हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.पंजाबी आई आणि मराठी वडिलांच्या पोटी जन्मलेल्या सोनालीने अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे. मात्र तिचा हा प्रवास सोपा नव्हता.

 • लष्करात होते सोनालीचे वडील

सोनालीचा जन्म पुण्याच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करातच नोकरी करत होती. सोनालीच्या वडिलांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केले. तर तिच्या आई, सविंदर या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD येथे काम केले आहे. या लष्करी पार्श्वभूमीमुळे माझ्यात डेअरिंग हे लहानपणापासूनच होतं, असं सोनाली सांगते.

 • आर्मी शाळेत झाले सोनाली शिक्षण, पत्रकारितेचे गिरवले धडे

सोनालीचे शिक्षण आर्मी स्कूल, केंद्रिय विद्यालयातून झाले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. मास कम्युनिकेशन अँड जर्नेलिझम या विषयात सोनालीने पदवीप्राप्त केली आहे. अर्थातच अभिनेत्री होण्यापूर्वी सोनाली पत्रकार आहे. तिने इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

 • कॉलेजमध्ये असताना केले मॉडेलिंग

सोनालीला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ती स्टेजवर यायची. प्रत्येक कल्चरल प्रोग्राममध्ये ती आवर्जुन सहभागी होत असे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण एक उत्कृष्ट मॉडेल होऊ शकतो, असे तिला वाटले. म्हणून 2005 मध्ये तिने एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे या सौंदर्य स्पर्धेत ती फस्ट रनरअप ठरली. त्यानंतर तिने काही प्रिंट अॅड्स आणि रॅम्प शोज केले.

 • नीट मराठी बोलता येत नव्हते

आर्मीचं बॅकग्राऊंड असलेल्या परिवारातून आलेली सोनाली पहिल्यांदा कॅमेरासमोर उभी राहीली ती एफटीआयआयमधील एका विद्यार्थ्याच्या माहितीपटाच्या शूटींगसाठी. त्यानंतर तिच्या मराठी इंडस्ट्रीतील अभिनयाला सुरवात झाली ती ई- टीव्हीवरील ‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेतून. वडील मराठी आणि आई पंजाबी असल्याने सोनाली बालपणापासूनच घरात हिंदीच बोलली. त्यामुळे सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिला मराठी नीट बोलता येत नव्हते. या मालिकेपासून तिने मराठी शिकायला सुरुवात केली होती.

 • असा मिळाला पहिला सिनेमा

‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेच्या सेटवर सोनालीला तिच्या पहिल्या चित्रपटाची म्हणजेच ‘गाढवाचं लग्न’ या सिनेमाची ऑफर मिळाली. या सिनेमातील तिची भूमिका अगदी छोटी होती. मात्र याच सिनेमातील तिच्या भूमिकेला पाहून दिग्दर्शक केदार शिंदे ह्यांनी तिला त्यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमात मुख्य अभिनेत्रीचा रोल दिला. या पहिल्याच सिनेमातील तिच्या अभिनयाला राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला. इथपासून तिच्या सिने करीअरला ख-या अर्थाने सुरुवात झाली. 

 • 'नटरंग'मध्ये अशी मिळाली सोनालीला संधी

बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमासाठी एका पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार घेण्यासाठी सोनाली स्टेजवर गेली. त्याचवेळी नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव यांची नजर तिच्यावर पडली. रवी जाधव यांनी तिला फोन करुन सिनेमाची ऑफर दिली. मात्र नृत्य येत नसल्याने ही भूमिका स्वीकारावी की नाही असा प्रश्न तिला पडला होता. पण त्यादृष्टीने सोनालीने तयारी सुरु केली. 

 • नटरंगसाठी गिरवले नृत्याचे धडे

सोनालीला फारसे चांगले नृत्य येत नव्हते. शाळेत असताना ती नऊ महिने भरतनाट्यम शिकली होती, त्यामुळे तेवढेच काय तिला नृत्य यायचे. मात्र नटरंगसाठी तिने नृत्याचे धडे गिरवले. विशेष म्हणजे या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात सोनालीचे मुंबईत घर नव्हेत. म्हणून ती अतुल कुलकर्णी, रवी जाधव, फुलवा यांच्या घरीच आलटून पालटून राहायची. ‘नटरंग’ ख-या अर्थाने माझ्यासाठी स्कूल होते. या सिनेमानेच मला भाषा शिकवली, अभिनय शिकवला, नृत्य शिकवले, असे सोनाली सांगते. या सिनेमाने रचलेला इतिहास हा सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीला अप्सरा मिळाली. या सिनेमातील तिच्या अभिनयाची आणि बहारदार नृत्याची सगळीकडे चांगलीच दखल घेण्यात आली आणि आज ती मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

 • 'अजिंठा' सिनेमासाठी दररोज करावा लागायचा दोन तास मेकअप

अजिंठा या सिनेमातील सोनालीचा पारो हा लूक नीता लुल्ला यांनी डिझाईन केला. पारोच्या मेकअपसाठी तिला दररोज दोन तास लागायचे. तो मेकअप दिवसभर तसाच ठेवायला लागायचा. तब्बल 45 दिवस तिला हा मेकअप करावा लागला होता. 

 • मराठी इंडस्ट्रीतील दोन सोनाली कुलकर्णी

मराठी इंडस्ट्रीत सोनाली कुलकर्णी हे सारखे नाव असलेल्या दोन अभिनेत्री आहेत. नावांमधील साम्य हा केवळ योगायोग आहे. दिल चाहता है, डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगं बाई अरेच्चा आणि असे बरेच हिंदी-मराठी सिनेमांत झळकलेली सोनाली कुलकर्णीच्या नावाशी साम्य असल्याने नटरंग फेम सोनाली मनोहर कुलकर्णीला ज्युनियर सोनाली म्हटले जाते. ज्युनियर सोनालीने नटरंग सिनेमानंतर लोकांचा गोंधळ होऊ नये, म्हणून स्वत:च्या स्पेलिंगमध्ये बदल केला. सोनालीने तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला असून ती तिचे नाव Sonalee असे लिहिते.

बातम्या आणखी आहेत...