आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक हात मदतीचा:सोनाली कुलकर्णीने वाढदिवासनिमित्त डॉक्टरांना भेट दिली पीपीई किट, जपलं सामाजिक भान 

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनालीचे वडील आणि भाऊ यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना पीपीई किट सुपूर्द केल्या.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने 18 मे रोजी आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. सोनाली कुलकर्णी हिने करोनाच्या या परिस्थितीत आपलं सामाजिक भान जपलं आहे. आज वाढदिवसानिमित्त तिने पिंपरी चिंचवडस्थित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला 95 पीपीई किट दिल्या आहेत.

सोनाली सध्या लॉकडाऊनमुळे दुबईत अडकली आहे. त्यामुळे तिचे वडील मनोहर कुलकर्णी आणि भाऊ अतुल कुलकर्णी यांनी रुग्णालयाला भेट देऊन पीपीई किट प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.यावेळी कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमिर गोरखे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, भांडार व्यवस्थापक राजेश निकम उपस्थित होते.

सोनालीने एका व्हिडीओद्वारे याची माहिती दिली असून ती म्हणली, “मी पिंपरी-चिंचवड शहरात राहते, शहरातील अनेक करोनाबाधित रुग्ण हे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे मी ठरवलं होते. याकामी माझ्या अनेक मित्रांनी मदत केली.'' 

बातम्या आणखी आहेत...