आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोड बातमी:सोनाली कुलकर्णीचा झाला साखरपुडा, वाढदिवशी चाहत्यांना दिले खास सरप्राइज; जाणून घ्या कोण आहे तिचा भावी पती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच सोनालीचा साखरपुडा झाला.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवशी चाहत्यांना एक खास सरप्राइज दिले. सोनालीचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला असून तिने ही गोड बातमी आपल्या वाढदिवशी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. 2 फेब्रुवारी रोजी दुबईत सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला. मात्र ही बातमी शेअर करण्यासाठी तिने 18 मे या दिवसाची निवड केली.  

सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे काही निवडक फोटो शेअर केले आणि  लिहिले, ''02.02.2020 ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...!''

दुबई मरिना या ठिकाणी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सोहळा पार पडला. घरच्या घरी पार पडलेल्या या साखरपुड्याला सोनाली आणि कुणाल यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

सोनालीचा भावी पती कुणाल बेनोडेकरला 'केनो' या नावानेही ओळखतात. कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. त्याचे शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झाले. त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतले. सोनालीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.  

बातम्या आणखी आहेत...